पारोळा(प्रतिनधी) वार्ताहर,शेळावे ता पारोळा।
जि प प्राथ शाळा धाबे ता पारोळा येथे व गांवात गट शिक्षणाधिकारी पं स पारोळा डॉ भावना भोसले यांच्या शासकिय परीपत्रकाच्या सूचने नुसार बेटी बचाओ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले।शाळेचे उपक्रमशिल मुख्याध्यापक जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे यांनी याबाबत रोज नवनवीन उपक्रम राबवुन जाणिव व जागृती निर्माण केली।बेटी बचाओ बेटी बढाओ बेटी पढाओ याबाबत नागरीकांना सजग केले।
स्त्री जन्माचे स्वागत करू या,मुलगा मुलगी एक समान।मुलगा हा वंशाचा दिवा तर त्या दिव्याला जन्म घालणारी स्त्रीच नसेल तर तर वंश कसा पुढे चालेल? तसेच गर्भलिंग तपासणी व पोटातच स्त्री अर्भकाची हत्या यावर शाळेतील मुले पृथ्वीराज भिल,ऋषिकेश भिल,ममता भिल,निकिता भिल,पूजा भिल यांनी पथनाट्य सादर केले।कोणीही मुलगा की मुलगी अशी अपेक्षा न ठेवता जन्माला येणाऱ्या अपत्याचे स्वागत करा।दोन मुलीही असल्या तरी आनंद माना।आपले कुटुंब लहान व मर्यादीत ठेवा।परराज्यात जाऊन गर्भलिंग तपासणी करू नका।असे करणारे डॉक्टर,सोनोग्राफी सेंटर यांना तर शिक्षा आहेच पण गर्भपात करणाऱ्या जोडप्यालाही शिक्षा आहे।ती एकप्रकारे हत्या असुन पातकही आहे।असा संदेश दिला।
या प्रसंगी स्त्री जातीचा सन्मान म्हणुन मुख्याध्यापक साळुंखे यांच्या पत्नी सौ चित्राताई पाटील यांनी उपस्थित सर्व बालिकांचे पूजन केले।मुलींना स्त्री सन्मानाचे प्रतिक म्हणुन बिंदी पाकिट व पायातील साखळ्या सप्रेम भेट दिल्या।सर्व मुलामुलींना खाऊ म्हणुन पारले बिस्किट पुडे व मिठाई म्हणुन सोनपापडी स्वहस्ते वाटप केली।
या प्रसंगी शामा भिल,ग्रा पं सदस्य अशोक भिल,गुलाब भिल,गुंताबाई भिल,जीजाबाई भिल व बहुसंख्य महीला व पुरुष उपस्थित होते।
रविंद्र भिल व विकेश भिल यांनी सहकार्य केले।