अमळनेर( प्रतिनिधी )अमळनेर सह पारोळा तालुक्यातील अनेक गावांत पाण्याअभावी दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याने गिरणा धरणातील पाणी पारोळा जवळील भोकरबारी धरणात सोडावे अशी मागणी आ शिरीष चौधरी यांनी लेखी पत्रांन्वये दि 12/9/2017 जा.क्र 292/2017 जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडे केली आहे
            यात म्हटले आहे की तालुक्यातील सडावण बु व परिसरातील अनेक गावे भोकरबारी धरणाच्या संपर्कात येतात तसेच हे धरण बोरी नदिच्याही संपर्कात असल्याने याचा फायदा पारोळा तालुक्यातील बोरी काठच्या गावांना होऊन या सर्व गावामधील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होण्यास मदत होईल यासाठी गिरणाचे आवर्तन सोडावे अशी मागणी आ चौधरी यांनी केली आहे