अमळनेर( प्रतिनिधी )जळगाव जिल्ह्यात दोन प्रमुख रस्त्याच्या कामासाठी शासनाच्या सार्व बांधकाम विभागात 89.10 कोटी एवढ्या भरघोस निधीची तरतूद झाली असून यात अमळनेर मतदार संघातील धुळे रस्त्याचा समावेश आहे या रस्त्याचे चौपदरीकरण व सुशोभीकरण करण्यासाठी 89.10 कोटी निधी पैकी यातून सर्वाधिक मोठा हिस्सा या कामास मिळेल अशी माहिती आ शिरीष चौधरी यांनी दिली
अमळनेर ते धुळे दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतुक वाढल्याने या रस्त्याचे चौपदरीकरण व सुशोभीकरण करण्याची संकल्पना हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ रवींद्र चौधरी यांनी मांडली होती यामुळे सदर कामास भरघोस निधी मिळावा अशी मागणी आ शिरीष चौधरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्व बांधकाम मंत्री ना चंद्रकांत पाटील यांच्याकडे करून सतत पाठपुरावा सुरु ठेवला होता अखेर त्यांच्या पाठपुराव्यास यश येऊन मार्च मध्ये झालेल्या अर्थसंकल्पात या रस्त्यांच्या कामाचा समावेश झाला व पावसाळी अधिवेशनात या कामाला मंजुरी मिळाली व आता अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार जळगाव जिल्ह्यातील चाळीस गाव, औरंगाबाद रस्ता आणि अमळनेर धुळे रस्ता या दोन कामांसाठी 89.10 कोटी एवढा भरघोस निधी उपलब्द झाला आहे यात चाळीसगाव रस्ता 15.16 कि मी चा असून अमळनेर रस्ता 19.60 किमीचा आहे यामुळे या निधीतून आपल्या हद्दीला अधिक प्राधान्य मिळून जास्तीची रक्कम अमळनेर धुळे रस्त्यास मिळेल अशी माहिती आ चौधरी यांनी दिली, दरम्यान या कामाचा डीपीआर तयार करण्याचे आदेश देखील महाराष्ट्र शासन उपसचिव(रस्ते) यांनी नाशिक विभागाच्या सार्वजनिक बांधकाम मुख्य अभियंत्यांना तात्काळ डीपीआर करण्याचे आदेश 27 सप्टेंबर रोजी दिले होते यामुळे या कामाचा डीपीआर तयार झाल्याने लवकरच कामाच्या प्रक्रियेस वेग येणार आहे
*धुळे रस्त्याचे होणार अत्याधुनिक सुशोभीकरण*
सदर निधीतून अमळनेरातील फरशी पूल ते नवल नगर म्हणजे 19.60 किमी पर्यंत रस्त्याचे मजबुतीकरण रुंदीकरण व सुशोभीकरण केले जाणार आहे,तसेच रस्त्यालगतच्या गावात कॉंक्रिटीकरण,गटारी,बसथांबे व रस्त्याचे सुशोभीकरण करून रस्त्यात आवश्यक तेथे लहान मोठे पूल बांधले जाणार आहेत,यासाठी अत्याधुनिक यंत्रमार्फत पाहणी केली गेली आहे व आवश्यकतेनुसार ट्रिमिक्स रस्ते टाकले जाऊन ठिकठिकाणी वृक्षारोपण केले जाईल व गरज भासेल तेथे रस्त्यातील पथदिव्यांचे स्थलांतर केले जाईल व विशेष म्हणजे अमळनेर पासून मंगरूळ एमआयडीसी पर्यंत रस्त्याचे चौपदरीकरंण व अत्याधुनिक सुशोभीकरण होऊन रस्त्यालगत फुटपाथ,सायकल ट्रॅक,पथदिवे लावली जातील यामुळे अमळनेर शहरात प्रवेश करताना रोमहर्षक अनुभव येईल असा विश्वास आ शिरीष चौधरी व डॉ रवींद्र चौधरी यांनी व्यक्त केला