चोपडा- निमगव्हान रस्त्यावर मजरेहोळ जवळ दुचाकीस अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मगन नवल पाटील वय ५२ रा पष्टाने ता धरणगाव या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यु झाला.

याबाबत प्राप्त माहिती अशी की मंगळवार दि ३ रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास धरणगावकडून चोपडाकडे एम एच १९ बिडी ९६९८ दुचाकीने येत असलेल्या मगन नवल पाटील वय ५२ रा पष्टाने ता धरणगाव यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने डोक्यास मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत नितीन आबाजीराव पाटील पोलीस पाटील आखतवाडे यांच्या खबरीने चोपडा शहर पोलीस ठाण्यात  अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तपास पो. नि. किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मंगेश शिंदे हे करीत आहेत.