अमळनेर(प्रतिनिधी) पिंपळी घरकुल आर्थिक ग़ैरव्यवहार प्रकरणी निलंबित असलेले ग्रामसेवक वासुदेव मारवडकर यांनी तब्बल 5 महिन्यानंतर ही ग्रुप ग्राम पंचायत खेड़ी( प्र.ज.)ग्रामपंचायतिला *दप्तर*सुपुर्द केले नाही. त्यामुळे लोकांच्या संशयाच्या वाटेला मोकळीकता निर्माण झालेली आहे. *येथे* *भ्रष्टाचार* *नाही* *ना*?अश्या उलट सुलट चर्चेला आता गावात उधान आले आहे.ही धक्कादायक बाब उघड झाली ती जयवंताबाई रूपचंद भील यांच्या अर्जावरुन, त्यांनी बँक नोंदि व घरपट्टी, पाणीपट्टी च्या पावती ची मागणी पंचायती पुढे केली होती तेव्हा ही बाब निदर्शनास आली
जयवंताबाई रूपचंद भील यांचे पती हे सरपंच पदावर कार्यरत असताना त्यांचे अचानक निधन झाल्यामुळे सरपंच पदाची जागा रिक्त झाली होती. नियमानुसार 7 दिवसाचे आत रिक्त झालेल्या पदाचि माहिती *जिल्हाधिकारी* याना कळवायची असते पण 11 महिने उलटूनही ती माहिती ग्रामसेवकाने व तत्कालीन प्रभारी सरपंच यांनी संगनमताने कळविली नाही परंतु ग्रामसेवकाने 6 ऑक्टोबर 2016 रोजी उपसरपंच यांच्या कड़े प्रभारी सरपंच पदाचि धुरा सोपवावी अश्या प्रकारची महिती गटविकास अधिकारी अमलनेर यांच्या कड़े दिली होती.बघता, बघता 11 महीने उलटून गेले असतांना अजून पोटनिवडनुक लागत नाही म्हणुन जयवंताबाई यांनी तहसीलदार, व गटविकास अधिकारी यांच्या कड़े चौकशी केली असता हे धक्कादायक सत्य समोर आले
निर्णय लागत नाही म्हणुन जयवंताबाई ह्या 3 ऑगस्ट 2017 रोजी *जिल्हाधिकारी* *जळगाव*यांच्या कड़े अर्ज घेऊन गेल्या, त्यांच्या अर्जाची दखल घेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प.)बोटे याना जिल्हाधिकारी यानी ताबड़तोब संबंधितावर कार्यवाही करण्याचे व चौकशी चे आदेश दिले होते परंतु आजही त्याची चौकशी लागली नाही
दि 10 ऑगस्ट 2017 रोजी जयवंताबाई यांचि मुलगी सुनंदाबाई भील यांनी दलित वस्तीतिल मंजूर काम दुसऱ्या वार्ड मधे झाले तेथे दलितं बांधव यांचा रस्ता कायमचा बंद केला तशेच पिण्याच्या पाण्याच्या पाइप लाइन वर अडथळा आणून दलितावर अन्याय दूर होणारे तशेच अभीयांता,यांच्या ही बाब लक्षात आणून देऊन सुद्धा कंट्राटदार व सरपंच यांनी मनमानी केली अश्या प्रकारचा अर्ज गटविकास अधिकारी याना दिला होता त्यांनी अभियंता गवले व विस्तार अधिकारी चिंचोरे याना चौकशी करण्याचे आदेश दिले होते परंतु तांत्रिक बाब है कारण पुढे करुण चिंचोरे यांनी वेळ मारत नेली त्याची चौकशी आजही नाही
28 ऑगस्ट 2017 रोजी घरकुल चे अमिष दाखवून 27 लोकांकडुन बेकायदेशीर रित्या पैसे वसूल करुण ग्रामसेवक वासुदेव मारवाडकर यानी भ्रष्टाचार केल्याचा आरोप करणारे तक्रारी पत्र *ग्रामविकास* *मंत्रालय*, *जिल्हाधिकारी* *मुख्यकार्यकारी अधिकारी* *गटविकास अधिकारी* यांच्या कड़े पाठविले असता कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शेवटी *10* *सेप्टेंबर* *2017*रोजी जिल्हाधिकारी जळगाव यांच्या कड़े लोकांनी धाव घेतली असता जिल्हाधीकारी यानी तत्काल चौकशी चे आदेश दिलेत व पोटनिवडनुक का लागत नाही? याचेही चौकशी करण्याचे आदेश दिलेत.परंतु आजपावेतो कोणतीही चौकशी लागलेली नाही.
चौकशी का लागत नाही?
हितसंबंधिताचा प्रशासनावर दबाव आहे काय?
ग्रामसेवक व तत्कालीन सरपंच यांच्यावर का कार्यवाही होत नाही?
अधिकारी यात गुंतले आहेत का?
अधिकारी व राजकारणी यांचे संगनमत आहे का?
याची चौकशी व्हावी ,चौकशी होत नाही म्हणुन लोकांमध्य असंतोष पसरला आहे
*झारितला* *शुक्राचार्य* *नेमका* *कोण*? आता शोधायची वेळ आलेली आहे
या प्रकारणाची चौकशी जर लवकर होत नसेल तर आम्ही तीव्र आंदोलन करु असा पवित्रा ग्रामस्थानी घेतला आहे
❗❗❗❗❗❗❗❗❗❗
प्रतिक्रिया
प्रभारी ग्रामसेवक दिपक सोनवणे
मी जेव्हा या गावाचा अतिरिक्त पदभार स्वीकारला तेव्हा मला निलंबित ग्रामसेवकाने सन 2016-17 चे दप्तर दिले नाही ग्रामस्थानी ग्रामसभेच्या वेळी दप्तर नाही म्हणुन गोंधळ घातला होता
मी संबंधित बाब वरिष्ठ अधिकारी यांच्या कडे लेखी स्वरुपात दिलेली आहे