जळगाव   -  दि.०२/१०/२०१७  रोजी जळगाव जिल्ह्यातील  ओबीसी-बहुजन समाजाच्या प्रमुख लोकांचा मेळावा येथे संपन्न झाला. त्यावेळी ओबीसी-बहुजन  चळवळीत काम करणारे सर्व पक्षीय समाज बांधव उपस्थित होते. सुरवातीला सीमेवर शहीद झालेले शहीद जवान आणि महाराष्ट्राच्या आत्महत्या करणाऱ्या शेतकरी बांधवाना श्रध्दांजली वाहण्यात आली.
मेळाव्याला सर्व तालुक्यातील व ग्रामीण भागातील सर्व नेते मंडळी व प्रमुख लोक उपस्थित होते. ओबीसी जनक्रांती परिषदचे संस्थापक अध्यक्ष श्री. अनिलभाऊ महाजन ह्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. मेळाव्याच्याचे प्रास्ताविक ओबीसी परिषदचे सल्लागार तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विनायकजी यादव यांनी केले. यावेळी ओबीसी जनक्रांती परिषदची भुमिका मान्यवरांना समजावून सांगितली. ओबीसी-बहुजन हिताचे अनेक विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित असलेल्या काही मान्यवर विचारवंतनी आपले विचार मांडून सदर मेळाव्यास मार्गदर्शन केले.
ओबीसी बहुजन समाजाच्या विषयावर  सांगोपान चर्चा करण्यात आली व  एकुण ०९ते १० ठोस ठराव एक मताने मंजुर करण्यात आले आहेत. हे ठराव राज्य सरकारला व केंद्र सरकारकडे पुढील कार्यवाहीसाठी  पाठविण्यात येणार आहेत.
ओबीसी-बहुजन हा देशाचा श्वास आहे. ओबीसी-बहुजन वाचला तर देश वाचेल सर्वच राजकीय पक्षांमध्ये गेल्या ४० वर्षापासुन  ओबीसी-बहुजन समाज बांधवांवर फार मोठ्या प्रमाणात अन्याय व उपेक्षा होत आहे. यासाठी ओबीसी जनक्रांती परिषद सनदशीर मार्गाने लढत आहे.   ओबीसी-बहुजनाच्या सर्वांगीण सर्वकश विकासासाठी सदर परिषद सनद शीर मार्गाने अखेर पर्यंत लढत राहणार आहे.
राज्य सरकारनेओबीसी-बहुजनाच्या हितासाठी जास्तीत जास्त योजना लागू कराव्यात. ओबीसी-बहुजनाच्या हितासाठी जास्तीचा निधी राज्य व केंद्र सरकारने जाहीर करावा व ओबीसी-बहुजन समाजाला न्याय मिळण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी पक्षीय पातळीवर आपल्या पक्षामध्ये मंडल आयोग पूर्ण पणे लागू करावा असे ओबीसी-बहुजन नेते अनिल भाऊ महाजन यांनी सांगितले. यावेळी जळगाव जिल्ह्यातील ओबीसी-बहुजन चळवळीत काम करणारे प्रमुख नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
बैठकीला वरील मान्यवर उपस्थित होते
अशोकभाऊ लाडवंजारी,डॉ.अभिषेक ठाकूर,मुरलीधर महाजन,वसंत पाटील,मुकेश कोळी,मंगलाताई बारी,सरिता ताई नेरकर,सविता महाजन, दीपक महाजन, दिलीप भोई,राजू शिंपी,महेंद्र बडगुजर,राजेंद्र चौधरी,राजू महाजन,अमित चौधरी, मुकुंद गोसावी,मेहुल पटेल,नितीन महाजन,सागर महाजन,देवराम माळी, यांच्या सह १८ पगडजाती १२ बलुतेदार जळगाव जिल्ह्यातील १५ तालुक्यातील प्रमुख ओबीसी बहुजन समाज बांधव या जिल्हा संघटन मेळाव्याला उपस्थित होते
अतिशय शिस्तबध्द पध्दतीने हि ओबीसी बैठक पार पडली असे सादरीकरण होते. ओबीसीची टोपी शाल व बॅच गळ्यात सर्व मान्यवरांच्या दिसत होतो. सदर बैठक अतिशय खेळीमेळीचे वातावरणात संपन्न झाली.शेवटी राष्ट्रगीत घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. दीपक महाजन यांनी आभार प्रकट केले.