अमळनेर(प्रतिनिधी)शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याने एकलहरे येथील सरपंच मिनाबाई फत्तेलाल पाटील यांना जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी अपात्र घोषित केले आहे.याबाबत एकलहरे येथील दयाराम माधवराव पाटील उर्फ डी. एम.पाटील व ज्ञानेश्वर विनायक पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विवाद क्रमांक 100/2017 दाखल केला होता.त्यानुसार बीडीओ व विस्तार अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन प्रत्यक्ष पाहणी केली. याप्रसंगी तयार केलेल्या अहवालात व मिळालेली कागदपत्रे अवलोकन करून सरपंच यांचे पती फत्तेलाल अर्जुन पाटील यांनी एकलहरे गावातील सरकारी ग.न.275/1व2 या सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाले आहे.