पारोळा (प्रतिनिधी)धाबे जि प प्राथ शाळेवर अनोखा उपक्रम जिवंत गांधीजी पूजन
दि 02 वार्ताहर शेळावे ता पारोळा
आज जि प प्राथ शाळा धाबे ता पारोळा येथे मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे यांनी अनोख्या पध्दतीने महात्मा गांधीजी यांची जयंती साजरा केली।राष्ट्र पुरुषांच्या प्रतिमेचे पूजन,जयंत्या पुण्यतीथी आपण नेहमी साजरा करतो।त्यांचे कार्य,देशासाठी योगदान,चरीत्र याला आपण उजाळा देतो।पण असे कोणताही पालक म्हणत व ठरवित नाही की माझा मुलगा महात्मा गांधी,भगतसिंग,विर सावरकर,संत एकनाथ,संत तुकाराम झाला पाहीजे।त्यांचे गुण आपल्या मुलात उतरले पाहीजे।त्यानेही देशासाठी बलीदान दिले पाहीजे।या राष्ट्र पुरुषांचे गुण त्यांची प्रेरणा विदयार्थ्यांना मिळावी म्हणुन शाळेतील विदयार्थी पृथ्वीराज भिल याला महात्मा गांधीजी बनवुन त्यांचे रुप देवुन त्यांचे पूजन केले।कु निकिता भिल इने कस्तुरबा गांधी यांची भूमिका पार पाडली।मुलांकडुन सत्याग्रह,चलेजाव चळवळ,मिठाचा सत्याग्रह,दांडी यात्रा यांचे प्रात्यक्षिक करून घेण्यात आली।तसेच युवकांकडुन शाळा,परीसर व गावाची स्वच्छता करून घेण्यात आली व नियमित स्वच्छतेचे धडे देण्यात आले।
यावेळी साळुंखे यांनी गांधीजीचे कार्य,देशासाठी बलीदान,त्यांची सत्य अहिंसा,स्वावलंबन,मौन सत्याग्रहाची शक्ती,जीवनात साधी राणी उच्च विचारसणी,गरजा मर्यादीत ठेवण्याची त्यांची पध्दत उपस्थित सर्वांसमोर मांडली।गांधीजीचे हे गुण आत्मसात करणे व त्याप्रमाणे जीवन जगणे हेच खरे त्यांना अभिवादन ठरेल व तशी शपथ मुलांना दिली।यावेळी रविंद्र भिल,युवराज भिल,समाधान भिलयांनी सहकार्य केले।हिरापूरकर उपस्थित ग्रामस्थ यांनी मुलांना रोख बक्षिसे दिली।