अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर महसूल कर्मचारी संघटना यांनी नायब तहसीलदारांना दिले निवेदन,निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात राज्य शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी 10 ऑक्टोबर 2017 पासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.या बेमुदत कामबंद आंदोलनात जळगाव जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी सहभागी आहेत.सर्वसामान्य जनतेने महसूल कर्मचाऱ्याच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना सहकार्य करावे असे अवाहन संघटने मार्फत करण्यात आले.निवेदन देतेवेळी,अमळनेर तालुका अध्यक्ष योगेश पाटील,कार्यध्यक्ष दिनेश सोनवणे,सचिव संदीप पाटील,सर्व महसूल कर्मचारी उपस्थित होते.