अमळनेर (प्रतिनिधी)
चालत्या बसला ब्रेक मारल्याने बसमधील महाविद्यालयीन विद्यार्थी जखमी चालकविरोधात गुन्हा दाखल झाला आहे
फिर्यादी जोत्स्ना प्रदीप पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा चालकविरोधात दाखल करण्यात आला आहे. झाडी येथील रहिवासी फिर्यादी यांचा मुलगा हर्षल हा यांचा हा मुलगा नवलभाऊ प्रतिष्ठानच्या यांच्या आयटीआय करत असून बसने रोज अप डाऊन करतो 27 सप्टेंबर रोजी हर्षल हा घरी झाडी येथे धार्मिक विधी असल्याने महाविद्यालयातून बस स्थानकात आला दुपारी 1 वाजता एम एच 20 बी एल 0934 अमळनेर सोनगीर बसने जाण्यासाठी 36 क्रमांकावर बसला होता त्याच्या बाजूला त्याचा मित्र बसला होता यात बसचालक व्ही आर पाटील हे बस चालवत असतांना प्रताप मिल जवळील वळणावर कोणताही विचार न करता बेपर्वा वाहन हाकत असतांना अचानक ब्रेक दाबला. यामुळे त्याच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली यात हात पूर्णपणे निकामी झाला यावेळी विद्यार्थ्यांनी व प्रवाशांनी चालकाशी वाद करून जखमी विद्यार्थ्याला दवाखान्यात दाखल करायला सांगितले त्यानंतर डॉ सुमित सूर्यवंशी यांच्या खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले व डॉक्टर आणि पोलिसांना बोलावत तक्रार दाखल केली त्यानंतर अमळनेर पोलिसात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे