अमळनेर (प्रतिनिधी)आय.टी. (माहिती तंत्रज्ञान)=क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसंदर्भात उपाययोजना सुचविण्याकरीता  महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने  आयटी महिला सुरक्षा राज्यस्तरीय समिती स्थापन केली असून त्यावर विधान परिषदेच्या आमदार स्मिता ताई वाघ यांची निवड करण्यात आली राज्यात मागील काही दिवसांमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱया महिला वर्गासाठी सुरक्षितेसाठी उपाययोजना सुचविण्याकरीता वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी,विधानपरिषद सदस्य व विधानसभा सदस्य यांचा समावेश असलेली समिती गठित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने नुकताच शासन निर्णय पारीत केला आहे.पुण्यासह इतर शहरात माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी अस्तित्वात उपाययोजनांचा अभ्यास करून महिलांच्या सुरक्षेसंदर्भात विशेष उपाययोजना सुचविणे अशी समितीची कार्यकक्षा आहे या राज्यस्तर समितीचा अध्यक्ष  अतिरिक्त पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला आहेत सदस्य म्हणून अतिरिक्त पोलिस महासंचालक. प्रज्ञा सरोदे,विशेष पोलिस  महानिरीक्षक.अर्चना त्यागी,विधान परिषदेच्या सदस्य आमदार.स्मिताताई वाघ व डॉ.आमदार.निलमताई गोऱ्हे ,विधानसभेच्या सदस्या आमदार.तृप्ती सावंत,देवयानी फरांदे यांचा समावेश आहे.