लोक न्यूज
अमळनेर नगरपालिकेच्या पाण्याच्या टाकीत उतरून व्हिडिओ बनवत गेल्या २२ ते २४ वर्षांपासून जलकुंभांची स्वच्छता झालेली नसल्याचा दावा करणारे उपनगराध्यक्ष प्रशांत निकम हे निव्वळ “स्टंटबाज” असून त्यांनी पालिकेचा इतिहास आणि वस्तुस्थिती जाणून घ्यावी, असा घणाघात विरोधी गटाच्या वतीने जितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. शहर विकास आघाडीने अनियमित व दूषित पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर स्वतःच्या अपयशावर पांघरूण घालण्यासाठी निकम यांनी नवीन स्टंट सुरू केल्याचा आरोपही त्यांनी केला.
ठाकूर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहर विकास आघाडीने शहरातील दूषित पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर २२ जून रोजी मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. मात्र प्रशासनाच्या विनंतीवरून आणि शहरातील कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन मोर्चा स्थगित ठेवत चर्चेला प्राधान्य देण्यात आले. यानंतर उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांनी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभांची २४ वर्षांपासून स्वच्छता झालेली नसल्याचा दावा केला. हा दावा वस्तुस्थितीला धरून नसून जनतेची दिशाभूल करणारा असल्याचे ठाकूर यांनी म्हटले आहे. अमळनेर शहरात एकूण सात पाण्याच्या टाक्या आहेत. त्यापैकी झामी चौकची टाकी सध्या पाडण्यात आली आहे , कोर्टामागील आणि लालबाग येथील अश्या तीन टाक्या १९९८ मध्ये जीवन प्राधिकरणाकडून पालिकेकडे हस्तांतरित झाल्या होत्या. नगराध्यक्षा जयश्रीताई अनिल पाटील यांच्या कार्यकाळात (२७ डिसेंबर २०११ ते ५ जुलै २०१४) तत्कालीन मुख्याधिकारी सोमनाथ शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली या टाक्यांची व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. त्या वेळी टाक्यांमधून मोठ्या प्रमाणात गाळ काढण्यात आल्याचा दावा करत निकम यांचा २४ वर्षांचा दावा धादांत खोटा असल्याचे ठाकूर यांनी म्हटले. याच कार्यकाळात ढेकूरोडवरील लक्ष्मीनगर, पैलाड आणि मुंदडानगर, रामवाडी, तांबेपुरा,येथील अश्या ५ नवीन जलकुंभांचे बांधकाम पूर्ण होऊन १ मार्च २०१४ रोजी त्यांचे लोकार्पण तत्कालीन खासदार ए. टी. पाटील, नगराध्यक्षा जयश्रीताई पाटील आणि आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत झाल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच प्रशासकीय काळात तांबेपुऱ्यातील पाचवी टाकी उभारण्यात आल्याची माहिती दिली.
शहर विकास आघाडीने पाणीप्रश्नावर आंदोलनाचा इशारा दिल्यानंतरच उपनगराध्यक्षांना टाक्यांची आठवण झाली का, असा सवाल उपस्थित करत गेल्या सहा महिन्यांपासून सत्ता हातात असताना त्यांनी काय केले, याचे उत्तर जनतेला द्यावे, अशी मागणी ठाकूर यांनी केली. मोर्चाच्या भीतीपोटी टाकीत उतरून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
सन २०१४ नंतर विविध नगराध्यक्षांच्या व प्रशासकीय कार्यकाळात टाक्यांची स्वच्छता का झाली नाही, याचा जाब विचारण्याचे धाडस प्रशांत निकम यांनी दाखवावे, असे आव्हान ठाकूर यांनी दिले. माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या कार्यकाळात माजी नगराध्यक्षा भारती चौधरी , माजी आमदार साहेबराव पाटील नगराध्यक्षा पुष्पलता पाटील तसेच प्रशासकीय यांच्या कार्यकाळाचा उल्लेख करत त्यांनी केवळ निवडक व्यक्तींवर आरोप करण्याऐवजी आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला.
प्रशांत निकम यांनी जनतेची दिशाभूल करणे थांबवून शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर ठोस काम करावे. नैतिकतेची जाणीव असेल तर लोकांच्या जिवाशी खेळणे थांबवून पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही जितेंद्र ठाकूर यांनी निवेदनातून केली आहे.