लोक न्यूज
मानवी प्रगतीमध्ये अंधश्रद्धेचे असंख्य अडथळे पसरलेले आहेत. तुम्ही चालत असलेली वाट अंधारी आहे. त्या वाटेवर प्रकाश झोत टाकला तर वाटेतील अडथळे स्पष्ट दिसू लागतात.वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रकाश झोत मानवाला सापडला आणि त्याच्या प्रगतीचा मार्ग मोकळा झाला असे प्रतिपादन कीर्तीवर्धन तायडे यांनी वक्त्यांच्या कार्यशाळेत बोलताना केले अध्यक्ष स्थानी युवा कल्याण प्रतिष्ठान, अंमळनेर अध्यक्ष प्रा. अशोक पवार होते. पंचायत समिती शिक्षण विभाग अमळनेर,अंधश्रद्धा निर्मूलन समिती अमळनेर व युवा कल्याण प्रतिष्ठान यांच्यावतीने 28 फेब्रुवारी राष्ट्रीय दिनानिमित्त वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर विठ्ठल नगर येथील अभ्यासिकेत विज्ञानाची आवड असणाऱ्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
कार्यशाळेचे प्रास्ताविक सुनील वाघमोडे यांनी केले. वैज्ञानिक दृष्टिकोनावर तयार केलेले वाचन साहित्य यावेळी सर्व वक्त्यांना वाटण्यात आले. 28 फेब्रुवारी विज्ञान दिनी वक्ते विविध शाळांमध्ये जाऊन व्याख्यान देणार आहेत.
या महत्त्वपूर्ण कार्यशाळेत पल्लवी पाटील, भारती पाटील तेजस्विनी पाटील, तरन्नुम मॅडम, विजयकुमार मोरे, डी ए धनगर, योगेश भदाणे, प्रा डॉ राहुल निकम, ज्ञानेश्वर मोरे, संजय जाधव, रूपाली पाटील, डॉ वंदना पाटील,अशोक रघुनाथ पाटील, रामेश्वर भदाणे,अशोक बिऱ्हाडे, महादू बैसाणे,निरंजन पेंढारे,भैय्यासाहेब साळुंखे, मिलिंद पाटील, योगेश पाटील,मिलिंद निकम, गोकुळ पाटील, निवेदिता कापडणे आदी मान्यवर वक्ते उपस्थित होते. डी ए पाटील यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यशाळेची सांगता झाली.