लोक न्यूज
जैतपीर, ता. अमळनेर दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा जैतपीर येथे इयत्ता चौथी ते सातवीच्या विद्यार्थिनींसाठी पारंपरिक पद्धतीने चूल मांडून भाकरी तयार करण्याचा अनोखा उपक्रम उत्साहात पार पडला. “अनुभव हा सर्वात मोठा शिक्षक असतो” या उक्तीप्रमाणे विद्यार्थिनींना प्रत्यक्ष कृतीतून स्वावलंबनाचे शिक्षण देण्याचा उद्देश या उपक्रमामागे होता.
आजच्या आधुनिक युगात गॅस व इतर साधनांचा वापर वाढला असला तरी पारंपरिक पद्धती जतन व्हाव्यात आणि विद्यार्थिनींना श्रमाचे महत्त्व समजावे, यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विद्यार्थिनींनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली चूल मांडणे, लाकूड रचणे, पीठ मळणे व भाकरी थापणे या सर्व प्रक्रिया स्वतः अनुभवल्या.
या उपक्रमात मुख्याध्यापक श्री. वसंत राजधर पाटील यांच्यासह श्री युवराज पाटील, श्री भगवान पाटील, श्री संजय शिसोदे, श्री किरण सर, श्रीमती अर्चना मॅडम, श्री राहुल पाटील तसेच श्रीमती माधुरी ताई यांनी सक्रिय सहभाग घेत विद्यार्थिनींना प्रोत्साहन दिले. शिक्षकांनी स्वतः भाकरी टाकून विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास निर्माण केला.
उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थिनींना स्वावलंबन, समूहकार्य आणि श्रमसंस्कार यांचे महत्त्व पटले. काही विद्यार्थ्यांनीही मदत करून स्त्री-पुरुष समानतेचा संदेश दिला. शेवटी सर्वांनी गरमागरम भाकरी, हिरव्या मिरचीचा ठेचा व शुद्ध शेंगतेलाचा आस्वाद घेतला.
हा उपक्रम विद्यार्थिनींसाठी जीवनमूल्य शिकवणारा आणि अनुभवातून शिक्षण देणारा ठरला असून परिसरात त्याचे कौतुक होत आहे.