अमळनेर (लोक न्यूज) – शहरातील न्यू प्लॉट परिसरात तब्बल ७५ ते ८० वर्षांपासून वास्तव्य करणाऱ्या भाडेकरू कुटुंबाचे घर कोणतीही पूर्वसूचना किंवा कायदेशीर प्रक्रिया न करता जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी शहरातील नामांकित बिल्डर सरजू गोकलानी यांच्यासह पाच ते सहा जणांविरुद्ध अमळनेर पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, न्यू प्लॉट भागातील देशमुख चाळ, टी.पी. नंबर 45/01 येथे शरद जाधवराव शिंदे यांचे दोन खोल्यांचे लोखंडी पत्र्याचे भाड्याचे घर आहे. संबंधित घरातील वीज व पाणी कनेक्शन शिंदे यांच्या नावावर असून त्यांचे कुटुंब गेल्या सात ते आठ दशकांपासून तेथे वास्तव्यास आहे.
दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजेच्या सुमारास, शिंदे कुटुंबाची कोणतीही संमती अथवा न्यायालयीन आदेश नसताना बिल्डर सरजू गोकलानी यांच्या सांगण्यावरून चार ते पाच इसम तसेच महेश देशमुख (सर्व रा. अमळनेर) यांनी जबरदस्तीने घरात प्रवेश केला. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने संपूर्ण घर जमीनदोस्त करण्यात आले.
या कारवाईदरम्यान घरातील लोखंडी गोदरेज कपाट, लोखंडी रॅक, स्टील रॅक, गॅसची स्टील शेगडी, कुलर, दोन पंखे आदी अंदाजे २० हजार रुपयांच्या घरगुती साहित्याचे नुकसान करण्यात आले. एवढ्यावरच न थांबता संबंधितांनी शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे.
दीर्घकाळ वास्तव्यास असलेल्या भाडेकरू कुटुंबावर अशा प्रकारे अचानक कारवाई करून त्यांना बेघर करण्याचा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात असून कायद्याचा बडगा न वापरता मनमानी पद्धतीने कारवाई केल्याचा आरोप होत आहे.
या प्रकरणी शरद शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरजू गोकलानी, त्यांचे चार ते पाच साथीदार व महेश देशमुख यांच्याविरुद्ध भादंवि कलम 329(3), 329(4), 324(4), 352, 351(2) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड करीत आहेत. घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली असून प्रशासनाने या प्रकरणात निष्पक्ष व कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.