लोक न्यूज
अमळनेर – 10 वी आणि 12 वी बोर्ड 
परीक्षा संपूर्णपणे कॉपीमुक्त 
वातावरणात पार पाडाव्यात यासाठी 
अमळनेर खाजगी कोचिंग क्लासेस 
संघटना (PTA) तर्फे आज (9 
फेब्रुवारी) शिक्षण विभागाला निवेदन 
देण्यात आले.
सदर निवेदन गट शिक्षणाधिकारी 
तसेच तहसीलदार तथा कार्यकारी 
दंडाधिकारी, अमळनेर यांना सादर 
करण्यात आले. यावेळी क्लासेस 
संघटना PTA अध्यक्ष भैय्यासाहेब 
मगर , स्वर्णदीप राजपूत, सुधीर टाकणे
सुनिल पाटील आदी PTA 
पदाधिकारी उपस्थित होते.
या निवेदनात मागिल परीक्षांमध्ये 
मोठ्या प्रमाणावर कॉपी झाल्याचे 
नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे 
गुणफुगवटा झाल्याने गुणवत्तापूर्ण 
विद्यार्थ्यांना अन्याय सहन करावा 
लागत आहे. परीक्षा हॉलमध्ये 
कॉपीमुक्त वातावरण नसेल, तर 
प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या 
विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होते, असे 
मत निवेदनात व्यक्त करण्यात आले 
आहे.
PTA संघटनेच्या वतीने संपूर्ण 
महाराष्ट्रात हे कॉपीमुक्त अभियान 
राबवले जात असून, या संदर्भात 
परीक्षांमध्ये प्रामाणिकता टिकवून 
ठेवण्यासाठी कठोर दक्षता घेण्यात 
यावी व मुक्त कॉपीला आळा बसावा, 
अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात 
आली आहे.