लोक न्यूज
खलाणे (ता.शिंदखेडा जि.जळगाव) –
आदर्श युवकांचे युवाशक्ती या सामाजिक संघटनेच्या वतीने आदर्श खलाणे गावातील सेवाभावी, प्रेमळ व सदैव तत्पर असलेले व्यक्तिमत्त्व, वरिष्ठ युवा एल.आय.सी. विमा अभिकर्ता तथा MDRT USA (अमेरिका) आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त श्री. कोमलसिंग जी. गिरासे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
श्री. कोमलसिंग गिरासे हे महाराष्ट्र व गुजरात राज्यातील असंख्य एल.आय.सी. कुटुंबांचे विश्वासू सदस्य असून, आपल्या प्रेमळ स्वभावाने, प्रामाणिक सेवेने व सामाजिक बांधिलकीने त्यांनी सर्वसामान्यांपासून ते युवकांपर्यंत प्रत्येकाच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. विमा क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना MDRT USA (अमेरिका) या आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
सामाजिक, शैक्षणिक व युवकांच्या प्रश्नांबाबत ते नेहमीच पुढाकार घेत असून, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेत भविष्यातील लोकनियुक्त सरपंच पदाच्या संभाव्य यादीत त्यांचे नाव समाविष्ट होत असल्याने ग्रामस्थांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण आहे.
या प्रसंगी आदर्श युवकांचे युवाशक्तीच्या वतीने परमेश्वर श्री चक्रधर स्वामी यांच्या चरणी प्रार्थना करण्यात आली की, श्री. कोमलसिंग गिरासे यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो व त्यांची सर्व स्वप्ने साकार होवोत. त्यांच्या सामाजिक व व्यावसायिक कार्यास भविष्यात अधिक यश लाभो, अशा सदिच्छाही यावेळी व्यक्त करण्यात आल्या.