लोक न्यूज
जळगाव जिल्ह्यातील झाडी येथील सौ. प्रतिभा महेश पाटील यांना “कृषि रत्न पुरस्कार 2026” प्रदान करण्यात आला आहे. Natural Human Rights Protection Council Forum या संस्थेतर्फे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. ही संस्था Ministry of Corporate Affairs अंतर्गत नोंदणीकृत व परवानाधारक असल्याचे सांगितले जाते.
शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. “उभ्या जगाचा पोशिंदा” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमाची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला.
सौ. प्रतिभा महेश पाटील या जळगाव जिल्ह्यातील प्रगतशील महिला शेतकरी असून त्यांनी शेतीत नवनवीन पद्धतींचा अवलंब करून चांगले उत्पादन मिळवले आहे. त्यांच्या कार्यामुळे परिसरातील इतर शेतकरी, विशेषतः महिलांना प्रेरणा मिळत आहे.
पुरस्कार प्रदान करताना शेतकऱ्यांच्या कष्टाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. “कष्टाचे मोल पूर्ण होऊ शकत नाही, मात्र सन्मानाने आदर करणे हीच खरी पावती आहे,” या शब्दांत त्यांना गौरविण्यात आले.
या सन्मानामुळे सौ. प्रतिभा पाटील यांचे नाव जळगाव जिल्ह्यासह राज्यभरात उजळले असून, त्यांच्या यशामुळे इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.