लोक न्यूज
अमळनेर : मराठी वाड्मय मंडळ व सावित्रीबाई फुले ज्येष्ठ महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने नांदेडकर हॉल येथे दिनांक १५ मार्च २०२६ रोजी महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून जळगाव येथील प्रसिद्ध डॉक्टर डॉ. स्वाती परीक्षित बाविस्कर उपस्थित होत्या, तर पाहुण्या म्हणून सौ. अनिता शिरीष चौधरी उपस्थित होत्या. त्यांच्या परिचयाचे काम सौ. सुरेखा बाविस्कर यांनी केले.
डॉ. स्वाती बाविस्कर यांनी मार्गदर्शन करताना ज्येष्ठ महिलांचे घरातील स्थान किती महत्त्वाचे असते हे स्पष्ट केले. कोरोना काळात स्वतः शिक्षण घेत असताना आपल्या सासूबाईंनी मुलीची कशी काळजी घेतली, याचे उदाहरण देत त्यांनी ज्येष्ठांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच ज्येष्ठांनी आपली तब्येत, सौंदर्य कसे जपावे आणि योग्य आहार कसा असावा याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी सौ. सुनीताताई शिरीष चौधरी यांनीही महिलांशी संवाद साधताना ज्येष्ठ महिला या घराचा कणा असतात, त्यांच्या माध्यमातून मुलांवर संस्कार होतात. त्यामुळे वयोमानानुसार त्यांचा सन्मान व सांभाळ करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमात सावित्रीबाई फुले ज्येष्ठ महिला मंडळाच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्या सौ. वसुंधरा लांडगे यांना सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या सामाजिक कार्याचा परिचय प्रा. उषा पाटील यांनी करून दिला. या पुरस्कारामध्ये मानपत्र, सावित्रीबाई फुले यांचा पुतळा, शाल व श्रीफळ असे स्वरूप होते.
सौ. वसुंधरा लांडगे यांनी मनोगत व्यक्त करताना डॉ. अपर्णा मुठे यांच्या नंतर मला हा दुसरा पुरस्कार मिळत असल्याचा आनंद व्यक्त केला व ज्येष्ठ महिला मंडळाचे आभार मानले.
अध्यक्षीय भाषणात सौ. कांचनताई शहा यांनी योग्य व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात आल्याचे समाधान व्यक्त केले.
त्यानंतर अमळनेर नगरपालिकेतील नवनिर्वाचित नगरसेविका सविता संदानशिव ,अपूर्वा चौधरी, कल्पना शर्मा, तसेच खा. शि. मंडळाच्या उपाध्यक्षा श्रीमती माधुरी पाटील व कार्यकारिणी सदस्या सौ. लीना पाटील यांचा मोगऱ्याचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सौ. योगिता कापडणेकर व माधुरी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले ज्येष्ठ महिला मंडळाने व्यसनमुक्ती विषयावर घोषवाक्य स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पल्लवी बागुल, अरुणा अलई व योगिता कापडणेकर यांना मिळाला, तर उत्तेजनार्थ पारितोषिक भारती कोळी यांना देण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात “खरा तो एकची धर्म” या प्रार्थनेने झाली. प्रास्ताविक सावित्रीबाई फुले ज्येष्ठ महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रा. शीला पाटील यांनी केले. त्यांनी मराठी वाड्मय मंडळाची ओळख करून देत ज्येष्ठ महिला मंडळ स्थापन करण्यामागील हेतू स्पष्ट केला. फेस्कॉमच्या माध्यमातून शासनाकडून ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या सवलतींबाबतही त्यांनी माहिती दिली.
सौ. गायत्री भदाणे यांनी महिलांना शपथ दिली. रत्ना भदाणे यांनी आभार प्रदर्शन केले, तर कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्रीमती स्नेहा एकतारे यांनी केले. कार्यक्रमाचा शेवट पसायदानाने झाला.
या कार्यक्रमासाठी डॉ. प्रा. शैलजा माहेश्वरी, सौ. मंगला चव्हाण, सौ. छाया पाटील, सौ. सुदर्शना पाटील, सौ. आशा भदाणे, सौ. अलका गोसावी, सौ. सुनंदा चौधरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.