लोक न्यूज
अमळनेर : हिंदू नववर्ष (गुढीपाडवा) निमित्त  गुरुवार दि. १९ मार्च २०२६ रोजी सकाळी ८ वाजता शहरात भव्य स्वागत शोभायात्रा निघणार आहे. प्रताप मिल येथील बंसीलाल पॅलेस येथून यात्रेला प्रारंभ होऊन ढोल-ताशे, घोषणाबाजी व आकर्षक देखाव्यांच्या माध्यमातून पारंपरिक व धार्मिक वातावरणात यात्रा मार्गक्रमण करणार आहे.
“हिंदू नववर्ष स्वागत समिती, अमळनेर” यांच्या वतीने आयोजित या २२ व्या वर्षीच्या यात्रेत विविध धार्मिक, सामाजिक संस्था, मंडळे तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
यात्रा प्रताप मिल स्टेशन रोड, स्वामी नारायण मंदिर, सुभाष चौक, राणी लक्ष्मीबाई चौक, दगडी दरवाजा, सराफ बाजार, वाडी चौक, माळी वाडा, झामी चौक पोलीस चौकी, राजहंस चौक, पवन चौक, तिरंगा चौक, पाचपावली देवी मंदिर, कोंबडी बाजार, विजय शॉपी, पोस्ट ऑफिस, बजरंग सुपर मार्केट मार्गे श्री संकटमोचन हनुमान मंदिर येथे समारोप होणार आहे.
नागरिकांनी घरासमोर रांगोळ्या काढून गुढी उभारावी तसेच कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.