लोक न्यूज

आज दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी झाडी गावात IDBI Bank च्या मिनी शाखेचे उद्घाटन सोहळा उत्साहात आणि मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. या नव्या मिनी शाखेमुळे परिसरातील नागरिकांना बँकिंग सुविधा त्यांच्या गावातच उपलब्ध होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कार्यक्रमास Atyati Technologies Pvt Ltd तसेच IDBI बँकेचे विविध मान्यवर अधिकारी उपस्थित होते. यामध्ये सर्फराज शेख (क्षेत्रीय प्रबंधक, IDBI Bank), निजामुद्दीन पिरजादे (राज्य प्रमुख, Atyati Technologies Pvt Ltd), निलेश काथड (वित्तीय समावेशन विभाग, IDBI Bank), धर्मा सर (PND, IDBI Bank), सुधाकर परिहार (प्रबंधक, IDBI Bank अमळनेर), सागर जी (उपप्रबंधक, IDBI Bank अमळनेर) आणि नवनीत देसले (क्षेत्रीय समन्वयक, Atyati Technologies Pvt Ltd) यांची प्रमुख उपस्थिती होती.

उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी ग्रामीण भागातील आर्थिक सक्षमीकरणासाठी मिनी शाखांचे महत्त्व अधोरेखित केले. ग्रामीण नागरिकांना बचत खाते उघडणे, रोख रक्कम जमा-उचल, शासकीय योजनांचे लाभ, तसेच विविध बँकिंग सेवा सुलभपणे उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. या सुविधेमुळे झाडी व परिसरातील नागरिकांना आता बँकेसाठी दूरवर जावे लागणार नाही.
कार्यक्रमास लोक न्युजचे संपादक संभाजी देवरे, संभाजी पाटील, भाऊसाहेब जगदाने, संदीप निकम, गायत्री पाटील, विशाल पाटील, बापु जगदाने, सुषमा पाटील, मनीषा पाटील, निता पाटील यांच्यासह गावातील सर्व महिला, ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समारोप प्रसंगी ग्रामस्थांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत IDBI बँक व संबंधित सर्व मान्यवरांचे आभार मानले. झाडी गावाच्या विकासाच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.