अमळनेर (लोक न्यूज)

शिवरात्रीच्या पावन निमित्ताने मुक्ताई महिला बहुउद्देशीय संस्था व जन्म प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “सकल ज्ञान महोत्सव सन्मान व बक्षीस वितरण सोहळा २०२६” अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे उत्साहात आणि दिमाखात पार पडला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंतांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात आला.
       या कार्यक्रमात देवगाव-देवळी येथील माध्यमिक शिक्षक तथा अमळनेर तालुक्यात गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले ईश्वर रामदास महाजन यांना “गुणवंत पत्रकार पुरस्कार २०२६” प्रदान करून गौरविण्यात आले. समाजहिताच्या जाणीवेने पत्रकारिता करत सर्व क्षेत्रातील बातम्यांना न्याय देत समाजाचे देणे फेडण्याची त्यांची भूमिका उल्लेखनीय ठरली आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण आणि प्रामाणिक कार्याची दखल घेत मुक्ताई महिला बहुउद्देशीय संस्था व जन्म प्रतिष्ठानचे पंकज भाऊ नाले व विश्वस्त मंडळाने त्यांना हा सन्मान बहाल केला.
    जळगावच्या नवनिर्वाचित महापौर दीपमाला काळे यांच्या शुभहस्ते ईश्वर महाजन यांना सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि मानाचा फेटा बांधून गौरविण्यात आले. सभागृहात उपस्थित मान्यवरांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून मा. डायट प्राचार्य निळकंठ आप्पा गायकवाड उपस्थित होते. तसेच आमदार राजू मामा भोळे, माजी महापौर जयश्रीताई महाजन, भुसावळच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष गायत्रीताई भंगाळे, गटशिक्षणाधिकारी तथा गट संचालक विजय पवार, सुनील पाटील (शिरपूर), विधीतज्ञ अॅड. निखिल पाटील, मराठी सिनेगायक संघपाल तायडे, अर्चना माळी, भारतीताई काळे, नीताताई सोनवणे, सुनील पाटील, मुकुंद रोटे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जी.एच. रायसोनी कॉलेज, जळगाव येथील डिपार्टमेंट ऑफ कॉम्प्युटर एप्लिकेशनचे एचओडी रफिक शेख यांनी भूषविले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन ज्योतीताई राणे यांनी केले, तर प्रस्ताविक किशोर पाटील यांनी सादर केले. सामाजिक कार्यकर्ते विजय लुल्हे सर व विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ईश्वर महाजन यांना गुणवंत पत्रकार पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल देवाजवळ हायस्कूलचे अध्यक्ष विलासराव पाटील, मुख्याध्यापक अनिल महाजन, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, दैनिक महाराष्ट्र सारथीचे संपादक संदीप पाटील, पत्रकार शैलेंद्र ठाकूर व संपूर्ण टीम, दैनिक शब्दगंगा संपादक देवेंद्र पाटील, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, पूज्य साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयाचे संचालक मंडळ, साने गुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक तसेच शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव केला.
तसेच व्हाईस ऑफ मीडियाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. डिगंबर महाले व अमळनेर व्हाईस ऑफ मीडिया पदाधिकाऱ्यांनीही ईश्वर महाजन यांचे विशेष अभिनंदन करून त्यांच्या पत्रकारितेतील कार्यास शुभेच्छा दिल्या.
ज्ञान, समाजकार्य आणि पत्रकारितेचा संगम असलेल्या या सोहळ्याने जळगाव शहरात सकारात्मक ऊर्जा निर्माण केली. गुणवंतांचा गौरव करत समाजाला प्रेरणा देणारा हा महोत्सव संस्मरणीय ठरला.