लोक न्यूज

अमळनेर :- शहरात बांधण्यात येत असलेल्या नवीन तहसील  कार्यालयाच्या  बाह्य परिसरात माजी उपमुख्यमंत्री स्व अजितदादा पवार यांचा पुतळा उभारण्यात यावा आणि त्यासाठी शासन स्तरावर यथायोग्य पाठपुरावा करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, कार्याध्यक्ष विनोद कदम यांच्यासह कार्यकर्त्यांनी आमदार अनिल पाटील यांना निवेदनाद्वारे केली आहे.
       अमळनेर तालुक्याच्या विकासासाठी विविध विकास कामांना स्व. अजितदादा पवार यांनी भरपूर निधी दिला आहे. महसूल इमारत ,प्रशासकीय इमारत , उपजिल्हा रुग्णालय , पंचायत समिती इमारत ,एस टी कार्यशाळा  आणि सर्वात मोठा निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरण यासाठी अजित पवारांचे योगदान असल्याने तालुक्याच्या विकासात त्यांचा हातभार असल्याने तालुक्याने त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी नवीन प्रशासकीय इमारत बाहेर त्यांचे स्मारक अथवा पुतळा उभारण्यात यावे. यासाठी खासदार स्मिता वाघ , आमदार अनिल पाटील , उपविभागीय अधिकारी ,तहसीलदार ,सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंते यांनी सामूहिक रित्या प्रयत्न करून पाठपुरावा  करून योग्य कागदपत्रे , प्रस्ताव बनवून शासनाकडे पाठपुरावा करावा असेही निवेदनात म्हटले आहे.  
         निवेदनावर शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, कार्याध्यक्ष विनोद कदम , इम्रान खाटीक , आलिम मुजावर , सचिन पाटील , राहुल गोत्राळ , कैलास पाटील , गोविंदा बाविस्कर , निलेश देशमुख , अर्षद खाटीक , भूषण पाटील , अनिल शिसोदे , सुलतान खाटीक , मधुकर पाटील , महेंद्र पाटील , अलीम मुजावर, किशोर देसले , जाकीर खाटीक , निखिल पाटील , पंकज जैन , जे व्ही बाविस्कर , एन जे पाटील , एस जी बत्तीसे , एस आर शिंगाणे , चेतन बोरसे , भैय्या वाघ , बाबा खाटीक , गौरव पाटील यांच्या सह्या आहेत.