लोक न्यूज
पत्रकार परिषदेमध्ये शिरीष चौधरी यांनी लोकप्रतिनिधी बद्दल बोलताना सुद्धा जीभ कशी घसरते ते सर्वांनी ऐकलेच आहे त्याला प्रतिउत्तर म्हणून मी त्यांना हे सांगू इच्छितो की आमच्या शहर विकास आघाडीचे नगरसेवक आणि नगरसेविका हे साक्षात ढाणे वाघ आणि वाघिणी आहेत. जे फक्त शोपीस असतात त्यांना पोपट म्हणतात.पोपटाला फक्त शोपीस म्हणून ठेवले जाते.जनतेला हे दिसू द्या की सभागृहामध्ये ढाण्या वाघ कोण आहेत आणि पोपट कोण आहेत? तुमच्या हिम्मत असेल तर प्रत्येक सभेचे लाईव्ह प्रक्षेपण करा. पहिल्याच जनरल मिटींगला आमच्या ढाण्या वाघांनी तुमची जी चिरफाड केली आहे की बाहेर येऊ नये म्हणून तुम्ही शहर विकास आघाडीने मागणी करूनही पहिल्या जनरल मीटिंग चे शूटिंग चे फुटेज देत नाहीत. तुमच्यात हिम्मत असेल तर प्रत्येक मीटिंग चे लाईव्ह प्रक्षेपण दाखवा, असे आव्हान नगरसेवक सचिन पाटील यांनी दिले
तुम्ही किती खरे किती खोटे किती सच्चे आणि किती भ्रष्ट आहेत हे लोकांना दिसू द्या. तुमची नीती चांगली असेल आणि तुम्ही भ्रष्ट नसाल तर लाईव्ह प्रक्षेपण दाखवायची आणि पत्रकारांना सभागृहात प्रवेश देण्याची हिंमत दाखवा. विधानसभा विधान परिषद लोकसभा राज्यसभा सर्व ठिकाणी पत्रकारांना सन्मानाने प्रवेश आहे. सर्व ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपण दाखवले जाते तशी हिंमत तुमच्यात का नाही? कारण तुमच्या अंतरात्माच मेलेला आहे. तुमचा आत्माच तुम्हाला म्हणतो आहे की आपण खोटे, भ्रष्ट आणि निरबुध्द आहोत. तुमची झाक झाकण्यासाठी तुम्ही पत्रकारांना प्रवेश देत नाहीत आणि लाईव्ह प्रक्षेपण दाखवत नाहीत.