अमळनेर | लोक न्यूज
सतत वेळेचे काटेकोर पालन करणाऱ्या अजितदादांनी २८ रोजी जीवनाची वेळ मात्र पाळली नाही. त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र वेदनेत बुडाला असून आता आम्ही कोणाकडे पाहायचे, असा भावनिक सवाल आमदार अनिल पाटील यांनी उपस्थित केला. अमळनेर येथे आयोजित सर्वपक्षीय शोकसभेत त्यांनी आपल्या शब्दांत अजितदादांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना हे मनोगत मांडले.
अमळनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात दिनांक १ रोजी सकाळी ९ वाजता दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेला विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
आमदार अनिल पाटील पुढे म्हणाले की, २०१६ साली माझ्यावर कर्जाचा डोंगर कोसळला होता. त्या वेळी मी भाजपमध्ये असतानाही अजितदादांनी माझ्या पाठीवर प्रेमाने हात ठेवला. तो आधार मिळाला नसता तर कदाचित मी आत्महत्येचा निर्णय घेतला असता, असे त्यांनी अत्यंत भावनिक शब्दांत सांगितले. अजितदादांचे ऋण कधीही विसरता येणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले की, अमळनेर तालुक्यात झालेल्या विकासात्मक कायापालटामागे अजितदादांचा मोठा वाटा आहे. आमदारांच्या अडचणी ऐकून घेऊन प्रत्येकाला भावाप्रमाणे वागणूक देत न्याय देण्याचे काम त्यांनी नेहमी केले.
यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील यांनी सांगितले की, पाडळसरे धरणाच्या बंद पडलेल्या कामाला गती देऊन आज जो पाणीसाठा उपलब्ध आहे, ती अजितदादांचीच देण आहे. त्यांच्या दूरदृष्टीचा लाभ तालुक्याला कायम मिळत राहील.
शोकसभेत माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, नगराध्यक्ष डॉ. परिक्षित बाविस्कर, ज्येष्ठ नेत्या तिलोत्तमा पाटील, भैरवी पलांडे, डॉ. अविनाश जोशी, संजय पुनाजी पाटील, संदीप घोरपडे, डी. एम. पाटील, शिवाजी पाटील, बी. के. सूर्यवंशी, मनोज पाटील, भागवत पाटील, खा. शि. मंडळ चेअरमन निरज अग्रवाल, वसुंधरा लांडगे, माजी सभापती डॉ. दीपक पाटील, सरपंच संघटनेतर्फे महेंद्र बोरसे, ॲड. शकील काझी, ॲड. तिलोत्तमा पाटील, मंगळ ग्रह मंदिरतर्फे दिलीप बहिरम, आम आदमी पार्टीतर्फे प्रा. गणेश पवार, नितीन भदाणे, इम्रान खाटिक, रिपाईतर्फे यशवंत बैसाणे, शिवसेनेतर्फे महेश देशमुख, अनिल शिसोदे, मुन्ना शर्मा, अमित पाटील, प्रा. योगिता कापडणे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
शोकसभेचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले.
या सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन मराठा समाजाचे विक्रांत पाटील, संजय पाटील, भाजपचे शीतल देशमुख, उमेश वाल्हे, पत्रकार संघाचे चेतन राजपूत, जितेंद्र ठाकूर, राष्ट्रवादीचे भूषण भदाणे, शेतकी संघाचे संजय पाटील तसेच विविध पक्ष व समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील, बिपीन पाटील, ॲड. ललिता पाटील, सुलोचना वाघ, रिटा बाविस्कर, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, सुषमा देसले, प्रा. अशोक पवार, मुक्तार खाटीक, राजेंद्र देशमुख, श्याम पाटील, हेमंत पवार, दाऊदी बोहरा समाजाचे प्रतिनिधी, नगरपालिका अधिकारी-कर्मचारी संघटना, जिल्हा बँक कर्मचारी, खा. शि. मंडळ, भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, शिक्षक संघटना, व्यापारी, कामगार, काच माळी समाज, मराठा समाज, कुणबी पाटील संघटना, ग्रामसेवक संघटना, पत्रकार संघटना, मराठा समाज महिला मंडळ, सावित्रीबाई महिला मंडळ, महिला मंच, रेशन दुकानदार संघटना, पोलीस पाटील, बाजार समिती आदी क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.