अमळनेर : राष्ट्रीय वयोश्री योजनेतून वृद्धांना मिळणारे जीवनोपयोगी साहित्य हे त्यांना जगण्याचा आधार आहे. वृद्ध माता पित्यांच्या चेहऱ्यावर आज पसरलेला आनंद हेच माझ्या कर्तृत्वाचे सार्थक असल्याचे प्रतिपादन खासदार स्मिता वाघ यांनी केले. भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारता मंत्रालय व ऍलिमको कंपनीच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय वयोश्री योजनेतून अमळनेर तालुक्याच्या वृद्ध नागरिकाना साहित्य वाटप प्रसंगी त्या बोलत होत्या. तालुक्यातील १२३५ वृद्ध नागरिकांना १ कोटी २० लाखाचे १५ प्रकारचे जीवनोपयोगी साहित्य मोफत वाटण्यात आले.
प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल अग्रवाल , माजी जिप सदस्य जयश्री पाटील , डॉ अनिल शिंदे , युवा नेत्या भैरवी पलांडे, भाजपा मंडल अध्यक्ष जिजाबराव पाटील, योगेश महाजन,ऍड व्ही आर पाटील,संदीप पाटील,हिरालाल पाटील,पंचायत समिती माजी सभापती श्याम अहिरे ,रेखा पाटील ,माजी उपनगराध्यक्ष मोहन सातपुते , राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील, बी डी ओ एन आर पाटील,नगरसेविका स्वप्ना पाटील, विजय राजपूत,विक्रांत पाटील, श्याम पाटील,भरतसिंग परदेशी, तुळशीराम हटकर, एल टी पाटील,मछिंद्र पाटील, हजर होते.
खासदार वाघ पुढे म्हणाल्या की वृद्धानाही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हावेसे वाटते , गप्पा ऐकायला आवडते , विविध पदार्थ खावेसे वाटतात , त्यांनाही भावना असतात. मात्र त्यांचे दात ,कान ,हात , पाय कमजोर होतात ते कृत्रिमरीत्या मजबूत करण्यासाठी हे प्रयत्न आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल म्हणाल्या की राज्यात वयोश्री योजनेची सुरुवात जळगाव जिल्ह्यातून होत आहे. खासदार स्मिता वाघांच्या प्रयत्नाने अमळनेर तालुक्यातील जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळाला आहे. माजी जिप सदस्य जयश्री पाटील यांनी देखील युती शासनाच्या या उपक्रमाचे कौतुक करून जेष्ठ नागरिकांना आनन्द देणारा हा प्रकल्प आहे असे सांगितले. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रप्रमुख एस पी गणेशकर यांनी ६० वर्षावरील नागरिकांना शासनातर्फे चालायला व्हील चेअर , शौचास कमोड चेअर , ऐकायला कर्ण यंत्र ,पाय, गुढघे ,कमरेचे पट्टे , काठी, खायला दात, बघायला चष्मे असे १५ प्रकारचे साहित्य देण्यात येणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संजय पाटील यांनी मानले.
यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात रामेश्वर येथील सुशीलाबाई पाटील , मथुराबाई पाटील , अल्काबाई पाटील , दरेंगावच्या कमलाबाई चव्हाण , कल्पनाबाई जोशी , लोण येथील हरिषचन्द्र पाटील, भीमराव पाटील , बन्सीलाल पाटील , युवराज पाटील , विश्वनाथ पाटील यांना साहित्य वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी एलिमको कंपनीचे किरण पावरा , दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे सदस्य मुकुंद गोसावी , राकेश पाटील ,राहुल चौधरी , समाधान पाटील , अमोल पाटील , प्रवीण पाटील यांनी सहकार्य केले.