लोक न्यूज-अमळनेर
ढेकू रोड येथील विश्वकर्मा मंदिरात विश्वकर्मा सुतार समाजाच्या वतीने प्रभू विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर होते. यावेळी उपनगराध्यक्ष इंजि. प्रशांत निकम, प्रवक्ते प्रा. डी. डी. पाटील, माजी कुलगुरू एस. ए. पाटील यांच्यासह समाजातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जयंतीनिमित्त समाजाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण ४० रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. जीवनज्योती ब्लड बँकेच्या वतीने रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल विश्वकर्मा मंडळास मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना समाजाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमानंतर समाजातील नागरिक व परिसरातील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
तसेच विश्वकर्मा मंडळ व प्रताप सायबर यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला ज्येष्ठ नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विश्वकर्मा मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यांनी तसेच समाजबांधवांनी विशेष परिश्रम घेतले.