लोक न्यूज
अमळनेर:-राज्याचे उपमुख्यमंत्री ,एक दमदार नेतृत्व सर्वांचे लाडके नेते अजित दादा पवार दुर्दैवाने अकाली आपल्याला सोडून गेले. त्यांना सामूहिक आणि सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दि १ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, अमळनेर येथे शोकसभा आयोजित करण्यात आली आहे.
अमळनेर तालुक्यातील सर्व नागरिक , राजकीय पक्ष , सामाजिक कार्यकर्ते , पदाधिकारी ,व्यापारी ,शिक्षक ,शासकीय कर्मचारी,आशा वर्कर्स ,लाडक्या बहिणी ,डॉक्टर्स , लायन्स ,रोटरी,महिला मंडळ , निमशासकीय कर्मचारी , महसूल संघटना ,वकील संघ, पत्रकार संघटना ,धरण संघर्ष समिती , शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी , प्राध्यापक संघ , मंगळग्रहसेवा संस्था , अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशन,स्वामींनारायण संस्था , संत सखाराम महाराज वाडी संस्थान ,भाजीपाला विक्रेते ,अंगणवाडी सेविका,पोलीस पाटील ,ग्रामसेवक ,तलाठी ,आजी व माजी नगरसेवक , एस टी कर्मचारी ,टॅक्सी युनियन, सर्व समाज पंचमंडळ तसेच इतर सर्व संस्था यांना आवाहन करण्यात आले आहे की अजित दादा आणि अमळनेरचा विकास यांचे २५ वर्षांपासून एक अतूट आणि हक्काचे नाते होते. त्यामुळे येथील प्रत्येक व्यक्तीचा दादाबाबत जिव्हाळा होता. अजित दादांच्या ऋणातून अमळनेर कधीच उतराई होऊ शकत नाही. मात्र सार्वजनिक शोक सभेतून आपल्या भावना आपण अनंतात व्यक्त करू शकतो. तरी सर्वांनी शोक सभेस आवर्जून यावे असे आवाहन सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावतीने करण्यात आले