संपूर्ण भारतवर्षात पूजनीय असलेल्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वाराणसी (काशी) येथील ऐतिहासिक स्मृतीस्थळावर बुलडोझर चालवून ते उद्ध्वस्त करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला असून, याविरोधात अमळनेर तालुक्यातील विविध धर्म, जाती, पंथ व समाजातील नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून तीव्र शब्दांत जाहीर निवेदन दिले आहे.
निवेदनात स्पष्ट शब्दांत आरोप करण्यात आला आहे की, देशाची आध्यात्मिक राजधानी मानल्या जाणाऱ्या वाराणसीत अहिल्यादेवी होळकरांच्या स्मृती पुसण्याचा हा सुनियोजित प्रयत्न असून, तो संपूर्ण भारतीय समाजाच्या अस्मितेवर घाला आहे. रस्ते, घाट, मंदिरे, धर्मशाळा, विहिरी, तलाव उभारून सामान्य जनतेसाठी आयुष्य वाहून घेणाऱ्या या थोर मातृशक्तीचा इतिहास पुसण्याचे पाप प्रशासनाकडून होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नैसर्गिक आपत्ती, आक्रमणे किंवा काळाची झीज देखील ज्यांच्या कार्याचा नाश करू शकली नाही, त्या अहिल्यादेवी होळकरांच्या स्मृती आज यांत्रिक बुलडोझरच्या जोरावर उद्ध्वस्त केल्या जात असल्याचे नागरिकांनी नमूद केले. विशेष म्हणजे, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशात त्यांच्या कार्याचा गौरव सुरू असतानाच अशी कारवाई होणे ही दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पुरातत्व विभागाचे कर्तव्य ऐतिहासिक वारशाचे जतन करणे असताना, त्याच विभागाच्या आशीर्वादाने स्मृतीस्थळ नष्ट केले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. “इतिहास जपायचा नाही, तर फक्त नाव लावून श्रेय घ्यायचे?” असा थेट सवाल या निवेदनातून पंतप्रधानांना करण्यात आला आहे.
हा प्रश्न केवळ एका जातीचा, पंथाचा किंवा समाजाचा नसून, संपूर्ण भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचा असल्याचे स्पष्ट करत, संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी, स्मृतीस्थळाचा पुनरुज्जीवन करावा व दोषींना शिक्षा द्यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
या जाहीर निषेधपत्रावर अमळनेर येथील विविध समाजघटकांतील नागरिकांच्या सह्या असून, सरकारने वेळीच दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.