लोक न्यूज
अमळनेर:-,येथील नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी माजी आमदारांनी दोन्ही गटांच्या नगरसेवकांना नंदुरबार मुक्कामी बोलावून उमेदवार ठरवल्याने स्थानिक स्वायत्ततेची अक्षरशः पायमल्ली झाली आहे. “पालिकेचा कारभार नंदुरबारहून चालणार” हा आमदार अनिल पाटील यांचा वादग्रस्त शब्द यावेळी प्रत्यक्षात खरा ठरला असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष मुक्तार खाटीक यांनी लगावला आहे.
यासंदर्भात खाटीक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की दि. ९ रोजी होणाऱ्या उपनगराध्यक्ष पदासाठी अनेक नगरसेवक इच्छुक असताना, दि. ८ रोजी शिंदे सेना व अपक्ष गटातील नगरसेवकांना नंदुरबार येथे हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. या बैठकीत शिरीष चौधरी यांचे खंदे समर्थक असलेले इच्छुक नगरसेवक आणि इतर इच्छुकांमध्ये जोरदार कलगीतुरा झाला. सत्ताधारी गटातील अंतर्गत मतभेद उघड्यावर आल्याने बैठक रणांगणात बदलल्याची चर्चा आहे. अखेर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे एकमेव नगरसेवक प्रशांत निकम यांचे नाव उपनगराध्यक्ष पदासाठी अंतिम करण्यात आले. मात्र हा निर्णय होताच अनेक वर्षांपासून एकनिष्ठ राहिलेले समर्थक नगरसेवक संतप्त होऊन तावातावाने बैठकीतून बाहेर पडल्याचे समजते. यामुळे सत्ताधारी गटातील असंतोष चव्हाट्यावर आला असून, ही फक्त सुरुवात असून पुढील काळात मोठी फूट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अमळनेरचा उपनगराध्यक्ष आणि निर्णय मात्र नंदुरबारात, ही परिस्थिती शहरासाठी लाजिरवाणी असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. उद्या इतर सर्व निर्णयांसाठी नगराध्यक्ष, नगरसेवक आणि अधिकारी नंदुरबारच्या खेपा मारणार का, असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. अमळनेर नगरपरिषद स्वतंत्र आहे की नंदुरबारची शाखा, असा खोचक प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत.पालिकेचा कारभार नंदुरबारहूनच चालणार, हे आमदार अनिल पाटील यांचे शब्द माजी आमदारांनी कृतीतून खरे ठरवले असून, लोकप्रतिनिधींनी जनतेच्या निर्णयाचा अवमान केल्याचा आरोप जोर धरू लागला आहे.आणि महत्वाचे म्हणजे आता निम्म्या फाईली नंदुरबार सापडतील असा आरोप देखील खाटीक यांनी केला आहे.