लोक न्यूज
जि. प. प्राथमिक शाळा, झाडी ता. अमळनेर जि. जळगाव येथे 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात माजी सैनिक श्री. चंद्रकांत विक्रम पाटील यांच्या हस्ते शालेय ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतं, भाषणं व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. यावेळी श्री. चंद्रकांत विक्रम पाटील यांनी विद्यार्थ्यांना देशसेवा, शिस्त, राष्ट्रप्रेम व शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
शाळेच्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी माजी सैनिक श्री. पाटील यांनी ₹5,151/- रुपयांची देणगी शाळेला दिली. त्यांच्या या स्तुत्य कार्याबद्दल शाळा व्यवस्थापन, शिक्षकवर्ग, विद्यार्थी तसेच ग्रामस्थांनी त्यांचे मनापासून आभार मानले.
माजी सैनिकांचा सन्मान व त्यांचे देशप्रेम पाहून उपस्थितांमध्ये अभिमानाची भावना निर्माण झाली.यावेळी उपस्थित सरपंच डॉ.भूपेंद्र पाटील,ग्रामपंचायत अधिकारी डीगंबर सौंदाणे,ग्रामस्थ,मुख्याध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप “जय हिंद” च्या घोषणांनी करण्यात आला.