लोक न्यूज
गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त, अतिसंवेदनशील व अतिदुर्गम भागात उत्कृष्ट, धाडसी व उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल पोलीस उपनिरीक्षक सतीश वामन पाटील यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) या पदावर वेगवर्धित पदोन्नती देण्यात आली आहे. राज्य शासनाने नुकतीच ही पदोन्नती जाहीर केली असून, गडचिरोली पोलीस दलातील जवानांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
मूळचे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील रणाई गावचे रहिवासी असलेले सतीश पाटील गेल्या साडेचार वर्षांपासून गडचिरोली जिल्हा पोलीस दलात कार्यरत आहेत. दीर्घकाळ नक्षलप्रभावित असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात सेवा बजावणे हे पोलीस दलासाठी नेहमीच मोठे आव्हान राहिले आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत विशेष अभियान पथक (C-60) च्या प्रभावी व धाडसी कारवायांमुळे नक्षलवादाला मोठा आळा बसला आहे.
C-60 पथकाने राबवलेल्या सातत्यपूर्ण नक्षलविरोधी मोहिमांमुळे अनेक जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले असून, नक्षल गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या अनेक नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. याच कारवायांचा परिणाम म्हणून अलीकडच्या काळात मोठ्या संख्येने नक्षलवाद्यांनी शस्त्र टाकून गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे.
पोलीस उपनिरीक्षक सतीश पाटील यांनी विशेष अभियान पथक (C-60) मध्ये कार्यरत असताना अनेक जीवघेण्या व अत्यंत कठीण परिस्थितींना सामोरे जात कर्तव्य बजावले आहे. त्यांनी आतापर्यंत पाच पोलीस–नक्षल चकमकींमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे.
दि. 17 जुलै 2024 रोजी वंडोली परिसरात झालेल्या पोलीस–नक्षल चकमकीत C-60 पथकाने 12 जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात मोठे यश मिळवले होते. या चकमकीदरम्यान सतीश पाटील हे अग्रभागी होते. कारवाईदरम्यान त्यांना उजव्या खांद्याला गोळी लागून गंभीर दुखापत झाली होती. जखमी अवस्थेतही त्यांनी धैर्य न सोडता कर्तव्य बजावले, याची पोलीस दलात विशेष दखल घेतली जाते.
सतीश पाटील यांच्या या अपवादात्मक शौर्याची व सेवाभावाची दखल घेत राज्य शासनाने त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) पदावर वेगवर्धित पदोन्नती दिली आहे. विशेष बाब म्हणजे, शासनाच्या वेगवर्धित पदोन्नतीच्या जीआरनुसार पदोन्नतीनंतरही त्यांची नियुक्ती गडचिरोली परिक्षेत्रातच कायम ठेवण्यात आली आहे.
या पदोन्नतीबद्दल पोलीस महासंचालक सदानंद दाते, अभियानाचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल तसेच गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सतीश पाटील यांचे अभिनंदन केले आहे.
उल्लेखनीय म्हणजे, सतीश पाटील यांना यापूर्वीच केंद्र सरकारचे राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक, पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह तसेच गृह विभागाचे विशेष सेवा पदक अशा मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
नक्षलग्रस्त भागात प्राणाची पर्वा न करता बजावलेल्या सेवेचे हे कौतुक असून, सतीश पाटील यांची ही पदोन्नती गडचिरोली पोलीस दलातील जवानांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.