लोक न्यूज
अमळनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण तापू लागले आहे. प्रभाग क्रमांक १३(ब) मध्ये श्री. प्रवीण बारकू महाजन यांनी प्रचार मोहिमेला सुरुवात केली असून, “शब्दात ताकद, विचारात जनतेचा विश्वास” या घोषवाक्याखाली नागरिकांशी थेट संवाद साधण्यावर त्यांचा भर आहे.
स्थानिक प्रश्न, विकास कामे आणि नागरिकांच्या अपेक्षांचा धागा पकडत महाजन यांनी “आपला हक्काचा माणूस” या ओळखीने प्रचार रचला आहे. त्यांच्या नेतृत्वावर तरुण कार्यकर्त्यांचा आणि नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते.
श्री. महाजन यांनी आपल्या प्रभागातील मूलभूत सुविधा, स्वच्छता, रस्ते व पाणीपुरवठा या विषयांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांच्या प्रचार पथकाने घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधण्यास सुरूवात केली आहे.
वरिष्ठ नेत्यांचा आशीर्वाद आणि कार्यकर्त्यांची साथ लाभल्याने या प्रभागात प्रचाराची रंगत वाढत चालली आहे. येत्या काही दिवसांत प्रभाग १३(ब) मधील निवडणुकीची लढत अधिक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.