लोक न्यूज
– येत्या दिवाळी सणानिमित्त कामगार, कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचारी आणि फॅमिली पेन्शनधारक यांना आर्थिक दिलासा मिळावा, यासाठी वेतन व पेन्शन आगाऊ स्वरूपात देण्याची मागणी कामगार संघटनेतर्फे करण्यात आली आहे. या मागणीसंदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यधिकारी श्री. रवींद्र चव्हाण यांना निवेदन सादर केले.मुख्याधिकारी श्री. नेरकर साहेब रजेवर असल्यामुळे हे निवेदन उपमुख्यधिकाऱ्यांकडे देण्यात आले. संघटनेच्या प्रतिनिधीमंडळामध्ये श्री. रघुनाथ मोरे, श्री. विकासजी जाधव, श्री. मुकेश बिऱ्हाडे, श्री. नवल बिऱ्हाडे, श्री. रूपचंद पारे, श्री. सुशील भोईर, श्री. गुरुचरण पवार, श्री. विनोदजी जाधव तसेच सेवानिवृत्त कर्मचारी सहभागी झाले होते.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, “दिवाळी हा आनंदाचा व खर्चिक सण असून, अनेक कर्मचाऱ्यांवर सणासुदीच्या काळात आर्थिक भार येतो. त्यामुळे माहे सप्टेंबर 2025 चे वेतन तात्काळ देण्यात यावे तसेच ऑक्टोबर 2025 या महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी आगाऊ स्वरूपात देण्यात यावे. तसेच सेवानिवृत्त कर्मचारी व फॅमिली पेन्शनधारक यांनाही सणानिमित्त आगाऊ रक्कम मिळावी.”
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “दरवर्षीप्रमाणे यंदाही कामगार व कर्मचारी यांना दिवाळीपूर्वी वेतन मिळाल्यास त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळेल. प्रशासनाने या मागणीवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा.”
उपमुख्य अधिकारी श्री. चव्हाण यांनी निवेदन स्वीकारून मागणी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले.