लोक न्यूज
 खान्देश शिक्षण मंडळाच्या विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये उभारण्यात आलेल्या विकासकामांचे लोकार्पण सोहळे उत्साहात पार पडले. नव्या सुविधांच्या माध्यमातून अमळनेर तसेच खान्देशातील शिक्षण व्यवस्थेला आधुनिक व तंत्रज्ञानाधारित दिशा मिळाली आहे.
या कार्यक्रमात फार्मसी महाविद्यालयाच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन, मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळेचे लोकार्पण, प्रताप महाविद्यालयातील भव्य सेमिनार हॉलचे उद्घाटन तसेच इंग्लिश मिडियम स्कूलच्या संगणक लॅबचे लोकार्पण अशा अनेक सुविधा विद्यार्थ्यांच्या सेवेत समर्पित करण्यात आल्या.
या उपक्रमामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची साधने उपलब्ध होऊन ज्ञानाच्या नव्या क्षितिजांकडे वाटचाल करण्याची संधी मिळणार आहे. संस्थेच्या प्रगतीसोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असे प्रतिपादन मान्यवरांनी यावेळी केले.
लोकार्पण सोहळ्याला जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीशभाऊ महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार अनुप अग्रवालअनिल पाटीलसत्यजीत तांबे, माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यासह खान्देश शिक्षण मंडळाचे पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, गुरुजनांनी व विद्यार्थ्यांनी या नव्या टप्प्याचे स्वागत करत शिक्षणाच्या प्रगतीचा नवा अध्याय सुरू झाल्याचा आनंद व्यक्त केला.