लोक न्यूज
अमळनेर: येथील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयाच्या मैदानावर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतर विभागीय बास्केटबॉल व व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न झाल्या जळगाव एरंडोल धुळे व नंदुरबार या विभागातून निवडल्या गेलेल्या खेळाडूंमध्ये अत्यंत चुरशीचे सामने यावेळी पाहायला मिळाले या सामन्यातील विजयी संघांमधून आंतर विद्यापीठीय क्रीडा स्पार्धांसाठी संघ निवडले जाणार आहेत.
            पहिल्या दिवशी बास्केटबॉल सामन्यांचे उद्घाटन विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा.डॉ.संदीप नेरकर यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अमळनेरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, धनदाईमाता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नानासाहेब डी.डी. पाटील, डॉ  दिलीप भावसार तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एच एम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या सामन्यांचे निरीक्षक व निवड समिती प्रमुख म्हणून डॉ नरेश बागल यांनी कामकाज पाहिले दिवसभर चाललेल्या या सामन्यांच्या अंतिम फेरीत मुलांमध्ये धुळे विभागाचा संघ तर मुलींमध्ये जळगाव विभागाचा संघ विजेता ठरला तर मुलांमध्ये जळगाव विभागाचा संघ व मुलींमध्ये धुळे विभागाचा संघ उपविजेता ठरला.
                 या सामन्यांच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा संचालक प्रा किशोर वाघ (एरंडोल), डॉ नीलिमा पाटील (जळगाव), डॉ. नितीन वाळके (धुळे), प्रा नितीन चौधरी (नंदुरबार), डॉ. संजय भावसार (पारोळा), डॉ. देवदत्त पाटील (मारवड), प्रा महेंद्र नगराळे (धुळे) यांनी सहकार्य केले तर स्पर्धेचे आयोजन एरंडोल विभागाचे सचिव डॉ. शैलेश पाटील यांनी केले.
                दुसऱ्या दिवशी आयोजित आंतर विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन सिनेट सदस्य डॉ.धीरज वैष्णव यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे मुख्य क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील, संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब डी.डी. पाटील व प्राचार्य डॉ एच एम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या सामन्यांचे निरीक्षक व निवड समिती सदस्य म्हणून डॉ कुणाल चव्हाण, डॉ. राहुल ठाकूर व डॉ.देवदत्त पाटील यांनी कामकाज पाहिले  अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यांमध्ये मुलांचा एरंडोल विभागीय संघ विजेता ठरला तर जळगाव विभागीय संघ उपविजेता ठरला मुलींच्या सामन्यांमध्ये जळगाव विभागीय संघ विजेता उत्तर धुळे विभागीय संघ उपविजेता ठरला.
            व्हॉलीबाल स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी नंदुरबार विभागाचे सचिव डॉ हसीन तडवी, दहिवेल महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ बी आर मोरे, डॉ मुकेश पवार, भालोद, डॉ. राहुल पाटील शिंदखेडा, प्रा.जितेंद्र पाटील जळगाव, डॉ. हर्षल सरदार पारोळा, डॉ  क्रांती क्षीरसागर चोपडा, डॉ. विजय पाटील चोपडा, प्रा. दीपक पाटील धरणगाव,  डॉ. सचिन पाटील अमळनेर यांनी विशेष सहकार्य केले. स्पर्धेचे आयोजन नियोजन व सूत्रसंचालन शैलेश पाटील यांनी केले तर या दोन्ही स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी धनदाई महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.