अमळनेर लोक न्यूज :
अमळनेर तालुक्यातील ज्येष्ठ नेत्या अँड. ललिता पाटील यांच्या नव्या राजकीय हालचालींनी पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. अनेक वर्षे काँग्रेस पक्षात सक्रिय राहिल्यानंतर त्यांनी काही काळापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता त्या शिंदे गटात जाण्याची तयारी करत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
मात्र, आतापर्यंत त्यांनी ज्या-ज्या पक्षात प्रवेश केला त्या पक्षांमध्ये ठोस संघटन उभारण्यात अपयश आले, अशी चर्चा स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांमध्ये आहे. ग्रामीण भाग असो वा शहरी परिसर — दोन्हीकडे संघटनात्मक बळ निर्माण करण्यात त्या अपयशी ठरल्याची टीका केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर जनतेतूनही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. “पक्ष प्रवेश हा जनतेच्या सेवेसाठी आहे की वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी?” असा सवाल नागरिक विचारत आहेत. अँड. पाटील यांच्या या संभाव्य निर्णयामुळे अमळनेरच्या राजकारणात पुढील काही दिवसांमध्ये नव्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.