लोक न्यूज
अखेर अमळनेर तालुक्यातील पोलीस पाटील संघटनेच्या तालुकाअध्यक्ष पदाचा मतदान प्रक्रियेतून लोकशाही पद्धतीने तिढा सुटला, गेल्या दोन महिन्यापासून पोलीस पाटलांचा तालुकाअध्यक्ष पदाबाबत वेळोवेळी बैठका घेऊनही तिढा सुटत नव्हता अखेर पोलीस पाटील गावकामगार संघाचे राज्यअध्यक्ष आदरणीय श्री. बाळासाहेब बाजीराव शिंदे, राज्यउपाध्यक्ष मा .श्री. ज्ञानेश्वरजी नामदेव महाजन, राज्यसंघटक श्री. भाऊसाहेब संतोष पाटील, श्री. निळकंठजी थोरात, श्री. साहेबरावजी राळे पाटील, महिला आघाडी अध्यक्षा तृप्तीताई मांडेकर, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष रोहिणीताई हांडे पाटील, महिला राज्य सदस्य लीलाताई पाटील, जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री. नरेंद्रजी शिंदे, धुळे जिल्हा अध्यक्ष श्री. प्रकाश पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, कार्याध्यक्ष, धुळे व जळगाव जिल्ह्यातील सन्माननीय सर्व पदाधिकारी, व अंमळनेर तालुक्यातील ज्येष्ठ पोलीस पाटील श्री. विलास धोंडू पाटील जानवे यांच्यासह तालुक्यातील सर्व पोलीस पाटील बंधू आणि भगिनी हजर होते,दीनांक ४ आक्टोबर २०२५ रोजी अमळनेर येथील प्रसिद्ध श्री. मंगळ ग्रह मंदिर येथे जिल्हा आढावा बैठकीसह खेडीमेडीच्या वातावरणात निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली, त्यात तालुक्यातील सर्व पोलीस पाटील बंधू भगिनींनी मतदान करण्याचा हक्क बजावला निवडणूक प्रक्रिया राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी पारदर्शकपणे पार पाडली श्री. विनोद शालिग्राम बोरसे (माजी सैनिक)पोलीस पाटील सात्री यांच्याशी संघाचे जिल्हा सचिव श्री. लखीचंद रमेश पाटील यांची सरळ लढत झाली विनोद बोरसे यांना ६४ तर लखीचंद पाटील यांना ५४ मते मिळाली.त्यात विनोद शालिग्राम बोरसे (माजी सैनिक) पोलीस पाटील सात्री हे विजयी झाले,लगेच राज्याध्यक्ष यांच्या उपस्थितीत नवीन तालुका अध्यक्ष यांची सनद देऊन नियुक्ती करण्यात आली, लवकरच तालुक्यातील उर्वरित कार्यकारणीची घोषणा तालुकाध्यक्षासह तालुक्यातील सर्व पोलीस पाटील बंधू-भगिनी यांच्या उपस्थितीत करण्यात येईल असे तालुकाध्यक्ष विनोद बोरसे यानी सांगितले, तालुक्यासह राज्यातील अनेक पोलीस पाटलांसह, समाजातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.