लोक न्यूज

अमळनेर शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर दिनेश महाजन आणि डॉ अश्विनी महाजन यांच्या नव्याने बांधलेल्या नूतन वास्तूत  स्थलांतर झाले असून त्या मोरया हॉस्पिटलच्या इमारतीचे उद्घाटन खासदार स्मिता ताई वाघ ,आमदार अनिल पाटील आणि महाजन परिवाराच्या जेष्ठ मान्यवरांच्या  उपस्थितीत संपन्न झाले, खासदार श्रीमती वाघ आणि आमदार पाटील यांनी डॉ महाजन दाम्पत्याला शुभेच्छा पर आशीर्वाद दिले, यावेळी डॉ अनिल शिंदे यांच्यासह शहरातील नामवंत डॉक्टर, राजकीय पक्षाचे नेते, सामाजिक संघटनेंचे कार्यकर्ते नातेवाईक उपस्थित होते
   डॉ दिनेश महाजन आणि डॉ अश्विनी महाजन यांच्या गणेश कॉलनी तील जुन्या मोरया हॉस्पिटल पासून थोडे पुढे हाके च्या अंतरावर नवीन अत्याधुनिक सोयी सुविधा असलेली नवीण वास्तू अर्थात डॉ दिनेश महाजन यांचे मोरया हॉस्पिटल उभारण्यात आली आहे त्यात
अत्याधुनिक वैद्यकीय सेवा आणि उपचार सुविधा उपलब्ध होणार आहेत.तसेच नामांकित मेडिक्लेस आणि हेल्थ इन्शुरन्स कंपन्याचे कॅश लेस सुविधा उपलब्ध आहे,