.         मोरया हॉस्पिटल अमळनेर

.       आयडीएफसी बँक अमळनेर

लोक न्यूज
शहरातील मोरया हॉस्पिटल, बहुगुणे हॉस्पिटल, तसेच धुळे रोडवरील आयडीएफसी बँक आणि ॲक्सिस बँक परिसरात नो पार्किंग झोनमध्ये बिनधास्तपणे वाहने उभी करणाऱ्या वाहनचालकांविरोधात अमळनेर पोलिसांनी आज सक्त कारवाई केली.
या कारवाईदरम्यान एकूण पंधरा हजार सातशे रुपये (₹15,700) इतक्या दंड  करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या स्पष्ट आदेशानुसार, पोलीस हवालदार विनय पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल विलास बागुल यांनी ही कारवाई अंमलात आणली.
पोलिसांनी नागरिकांना इशारा दिला आहे की, शहरात कोणत्याही नो पार्किंग झोनमध्ये वाहन उभं केल्यास तत्काळ दंडात्मक कारवाई करण्यात येईल. अशा प्रकारच्या कारवाया रोज सुरू राहतील.
वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून, सार्वजनिक ठिकाणी अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई केली जाईल, असा निर्वाणीचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.



कडक पोलिस कारवाई – अमळनेर शहरात नो पार्किंग झोनमध्ये वाहनं उभी केल्यास भरावा लागणार दंड!
मोरया हॉस्पिटल, बहुगुणे हॉस्पिटल, तसेच धुळे रोडवरील आयडीएफसी बँक आणि ॲक्सिस बँक परिसरात नो पार्किंग झोनमध्ये उभी केलेल्या वाहनांवर अमळनेर पोलिसांकडून धडक कारवाई!
पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या आदेशावरून
पो.ह. विनय पाटीलपो.कॉ. विलास बागुल यांनी मिळून केली कारवाई.
दंडाची एकूण रक्कम: ₹15,700