लोक न्यूज
अमळनेर येथील कै. श्री. दादासाहेब व्हि़. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दिनांक 30 सप्टेंबर 2025, मंगळवार रोजी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात साजरा करण्यात आला. या खास प्रसंगी शाळेत दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करून रंगीबेरंगी पोशाखात गरबा आणि दांडिया नृत्याचे मनमोहक सादरीकरण केले. त्यांची नृत्यशैली, जोश आणि आत्मविश्वास यामुळे संपूर्ण वातावरण आनंदमय झाले. कार्यक्रमात केवळ विद्यार्थ्यांनीच नव्हे तर शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग देखील सहभागी झाले होते, ज्यामुळे दांडिया महोत्सव आणखीनच रंगतदार झाला.
कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या सांस्कृतिक विभागाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीचे आणि परंपरेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
या वेळी शाळेचे प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत असे उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये संघभाव, कला आणि सामाजिक सहभाग वाढवतात असे सांगितले.
कार्यक्रमाची सांगता सामूहिक नृत्याने आणि आनंदाच्या वातावरणात करण्यात आली. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी – सर्वांनी या आनंद सोहळ्याचा मनमुराद आनंद घेतला.
कार्यक्रमाची सुरवात संस्थेच्या सचिव सौ.अलका पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्या नंतर दुर्गामातेची मनोभावे आरती व पूजन करण्यात आले. आरतीचा मान शाळेच्या प्राचार्या सौ. वर्षा सोहिते व सर्व शिक्षक वृदांना देण्यात आला. विद्यार्थ्यांनी सुंदर गरबा नृत्य सादर करून उपस्थित नागरिक आणि पालकांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका नीतू शेलकर यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षिका प्रतीक्षा पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका मनीषा सोनार, कविता पाटील,संगीता पाटील,योगिता फालके, मनीषा ठाकूर,रोशनी महाजन,प्रियंका महाले,जया परदेशी, तसेच शिक्षकेतर कर्मचारी सविता चौधरी व भाग्यश्री पाटील यांचे अमूल्य सहकार्य लाभले.