लोक न्यूज
मुंदडा फाऊंडेशन संचलित श्री.एन.टी. मुंदडा ग्लोबल व्हयु स्कुल,अमळनेर येथे विद्यार्थ्यांना आपल्या सणांचे महत्व कळावे यासाठी शाळेत दिनांक 01/10/2025 रोजी नवरात्र व विजयादशमीचे औचित्य साधुन "राम-रावण युध्द"व "नवरात्र उत्सव" या दोन नाटीकेचे सादरीकरण करण्यात आले. 

यात रामायणाचे उत्कृष्ट सादरी करण करत रावणवध दाखविण्यात येवुन, नवरात्रीच्या
सर्व नउ देवींचे दर्शन घडविण्यात आले. सदर नाटीकेत प्ले ग्रुप ते इयत्ता 10 वी
च्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. नाटीका यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक,
शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. तसेच याच
दिवशी विद्यार्थ्यांना नवरात्री उत्सवाचा आनंद लुटता यावा यासाठी शाळेच्या
पटांगणावर साउंडसिस्टीमची अॅरेंजमेंट करून विद्यार्थ्यांसाठी गरब्याचे आयोजन
करण्यात आले. त्यामुळे शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी गरब्याचा मनोसोक्त आनंद घेतला.
सदर नाटीका व गरबा आयेजनाबाबत संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. ओमप्रकाश भाऊ मुंदडा, चेअरपर्सन सौ. छाया भाभी मुंदडा, सचिव श्री. अमेय मुंदडा, सह सचिव श्री. योगेश मुंदडा, श्री. नरेंद्र मुंदडा, श्री. राकेश मुंदडा, श्री. पंकज मुंदडा, अॅडमिनीस्ट्रेटर सौ. दिपीका मुंदडा, सर्व पदाधिकारी यांनी प्राचार्य श्री. लक्ष्मण सर, प्राचार्या सौ. विद्या मॅडम, प्रि-प्रायमरी कोऑडीनेटर सौ. योजना ठक्कर, सर्व शिक्षक-शिक्षिका, व शिक्षकेतर कर्मचारी यांचे कौतुक करत अभिनंदन केले.