लोक न्यूज
अमळनेर : तालुका मराठा समाजातर्फे समाज भूषण पुरस्कार व गुणवंतांचा गुणगौरव समारंभ तसेच समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा ५ ऑक्टोबर रोजी कै सुंदराबाई दिनकरराव देशमुख मराठा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.
सकाळी १० वाजता आमदार अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या हस्ते पारोळा एरंडोल मतदार संघाचे आमदार अमोल पाटील , ढेकू चे उपसरपंच नथु गुणवंतराव सोनवणे , अमळगावचे लोकनियुक्त सरपंच गिरीश सोनजी पाटील , डीवायएसपी विनायक कोते , पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम , आर टी ओ मयूर निकम , जेष्ठ पत्रकार पांडुरंग पाटील याना मराठा समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खासदार स्मिता वाघ , माजी आमदार डॉ बी एस पाटील , माजी आमदार साहेबराव पाटील , माजी नगराध्यक्ष विनोद पाटील उपस्थित राहणार आहेत. तसेच दहावी ,बारावी तसेच विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थी तसेच नागरिकांचा सन्मान करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे दुपारी एक वाजता मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा त्याच ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. तरी मराठा समाजाच्या नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे.