लोक न्यूज
अमळनेर : तालुक्यातील मौजे मूडी येथे महसूल विभागाच्या पथकाने कारवाई करून अनधिकृत गौण खनिज (वाळू) वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले. या कारवाईत दोन्ही ट्रॅक्टर मुद्देमालासह जप्त करून तहसिल कार्यालय, अमळनेर येथे जमा करण्यात आले आहेत.
वाळू चोरीच्या वाढत्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी महसूल विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत तहसिलदार श्री. रुपेशकुमार सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मौजे मूडी परिसरात गस्त घालत असताना ही कारवाई केली. पथकात ग्राम महसूल अधिकारी श्री. सुधीर पाटील (गडखांब), मंडळ अधिकारी श्री. नरेंद्र धनराळे तसेच अन्य कर्मचारी उपस्थित होते.
महसूल विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील विविध ठिकाणी अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर सतत लक्ष ठेवले जात असून, अशा बेकायदेशीर कृतींविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार आहे.