लोक न्यूज
शहरातील मुख्य रस्त्यांवर तसेच हॉस्पिटल, बँका आणि खासगी क्लासेसच्या परिसरात वाहनांची अवैध व अनियमित पार्किंग नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न बनली आहे. या बेकायदेशीर पार्किंगमुळे नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत असून, याकडे प्रशासनाचे आणि वाहतूक विभागाचे लक्ष जात नसल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
❗ त्रासदायक परिस्थिती
अनेक हॉस्पिटल्सजवळ रुग्णवाहिका अडकतात, वेळेवर उपचार मिळत नाहीत. बँकांसमोर वर्दळीच्या वेळेत गाड्यांचा नुसता रस्ता अडवलेला असतो. क्लासेसजवळ पालक व विद्यार्थ्यांची गर्दी असते, आणि त्यातच अडथळा निर्माण करणाऱ्या बेशिस्त गाड्या – ही परिस्थिती सामान्य झाली आहे.
📍 ठिकठिकाणी पार्किंगचा गोंधळ
• हॉस्पिटल, सुभाष चौक परिसर,बाजार पेठ,एस.टी. स्टँड परिसर, बँक परिसर,खाजगी क्लासेस,कॉलेज रोड,धुळे रोड शहरातील प्रमुख ठिकाणं असून इथे पार्किंगचा मोठा गोंधळ पहायला मिळतो.
• काही ठिकाणी "नो पार्किंग" बोर्ड असूनही त्याची सर्रास पायमल्ली केली जाते.
• वाहने रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी उभी केल्याने आपत्कालीन सेवा देखील अडकतात.
🛑 प्रशासनाची भूमिकाच गोंधळात टाकणारी..
काही भागांत देखील निवडक आणि अपारदर्शक कारवाईला दुजाभाव केला जातो, असा आरोप काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.
📢 नागरिकांची मागणी
• सर्व हॉस्पिटल, बँका, क्लासेसजवळ "नो पार्किंग" झोन स्पष्ट करावेत.
• सीसीटीव्हीच्या मदतीने नियमभंग करणाऱ्यांवर ऑन द स्पॉट दंड आकारावा.
• नियम सर्वांवर समानपणे लागू व्हावेत – कोणताही पक्षपात न करता.
• वाहनतळ (Parking Zones) ठरवून योग्य साइनबोर्ड व मार्किंग करावं.
• वाहतूक नियंत्रणासाठी स्वतंत्र शहर वाहतूक शाखा कार्यरत करावी.

👉 "कारवाई फक्त काही ठिकाणी, बाकी ठिकाणी डोळेझाक – असं कसं चालेल? नियम सर्वांसाठी सारखाच...

शहरातील रहदारी व्यवस्थेचा पुनर्विचार होणं गरजेचं आहे. यासाठी प्रशासन, पोलीस विभाग, व्यापारी आणि नागरिक यांच्यात समन्वय असलेलं धोरण तयार केलं गेलं पाहिजे. अन्यथा ‘बाकीचे तुपाशी, बाकीचे उपाशी’ अशी स्थिती कायम राहील.