लोक न्यूज
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या वर्षी आपल्या कार्याची शंभर वर्षे पूर्ण करत आहे. या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने संघाच्या वतीने देशभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर अमळनेर नगर विभागात विजयादशमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. विजयादशमी हा संघाचा उत्सवांपैकी एक प्रमुख उत्सव असून, तो संघाच्या विचारधारेचा, शिस्तीचा आणि राष्ट्रप्रेमाचा प्रतीक मानला जातो.
पथसंचलनाने होणार उत्सवाची सुरुवात
सर्वप्रथम, गुरुवार दि. ०२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ७.३० वाजता अमळनेर शहरात पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संचलन म्हसकर प्लॉट, स्वामी नारायण मंदिरासमोर, स्टेशन रोड येथून सुरू होणार असून, ठरलेल्या मार्गावरून ते पार पडेल. संघ स्वयंसेवक पूर्ण गणवेशात, घोषवादन आणि शिस्तबद्ध संचलनातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शंभर वर्षांची शौर्यगाथा जनतेपुढे मांडणार आहेत.
तीन ठिकाणी होणार स्वतंत्र विजयादशमी उत्सव
या वर्षी अमळनेर विभागात तीन भागांमध्ये स्वतंत्र विजयादशमी उत्सव आयोजित करण्यात आले आहेत:
✅ संत सखाराम महाराज नगर उत्सव
• दिनांक: शनिवार, ०४ ऑक्टोबर २०२५
• वेळ: सायंकाळी ६.०० वा.
• स्थळ: संत सखाराम महाराज वाडी संस्थान पटांगण
• प्रमुख पाहुणे: डॉ. विक्रांतजी पाटील (M.D. मेडिसिन)
• प्रमुख वक्ते: श्री. अनिलजी भालेराव (मा. प्रांत संघचालक, देवगिरी प्रांत)
या कार्यक्रमात संघाचे शंभर वर्षांतील योगदान, चालू घडामोडीतील भूमिकांचे विश्लेषण, आणि समाजजागृतीचे महत्त्व अधोरेखित केले जाणार आहे.
✅ श्रीमंत प्रतापशेठ नगर उत्सव
• दिनांक: रविवार, ०५ ऑक्टोबर २०२५
• वेळ: सायंकाळी ६.०० वा.
• स्थळ: बजरंग सुपर मार्केट समोर, प्रताप मिल कंपाऊंड
• प्रमुख पाहुणे: डॉ. निखीलजी बहुगुणे (M.D. मेडिसिन)
• प्रमुख वक्ते: श्री. सिद्धेश्वरजी बिराजदार (धर्मजागरण प्रमुख, देवगिरी प्रांत)
या कार्यक्रमात धर्मजागरण, सांस्कृतिक पुनरुत्थान आणि देशातील सद्यस्थितीवर भाष्य केले जाणार आहे.