मुंदडा नगर दोन येथील गलवाडे रोडवरील प्लॉट नंबर 54 जवळील गटारीत गेल्या अनेक दिवसांपासून सांडपाणी साचले आहे. परिणामी, परिसरात तीव्र दुर्गंधी, डासांचा उपद्रव आणि साथीचे रोग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर याचा गंभीर परिणाम होत आहे.
स्थानिक नागरिक हनुमंतराव गुलाबराव पाटील यांनी यासंदर्भात नगरपालिकेकडे वेळोवेळी तोंडी आणि लेखी स्वरूपात तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र, अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
हनुमंतराव पाटील म्हणाले,
“गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही ही समस्या सहन करत आहोत. गटारीत साचलेल्या पाण्यामुळे मुले, वृद्ध, महिलांना त्रास होत आहे. आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होत आहेत. वेळेत उपाययोजना न झाल्यास नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होऊ शकतो.”
डेंग्यू, मलेरिया आणि त्वचारोग यांसारख्या रोगांचा धोका वाढत असल्याने तत्काळ गटारीचे सफाई, निर्जंतुकीकरण व जलनिस्सारणाची व्यवस्था
लवकरात लवकर करण्यात यावी.