लोक न्यूज
साक्री प्रतिनिधी.. कोकणी समाज मंडळ साक्री शहर यांच्या मार्फत नवरात्रोत्सवानिमित्त साक्री येथे कणसरा माता महोत्सव 2025 आयोजन केले होते. व आजच्या आरतीचा मान साक्री विधानसभा मतदार संघाच्या आमदार सौ. मंजुळाताई गावित यांना देण्यात आला होता.
प्रकृतीपूजक आदिम आदिवासी संस्कृतीचे जतन आणि संवर्धनासाठी त्याचबरोबर सामाजिक, वैचारिक प्रबोधन व्हावे, या उत्सवाच्या माध्यमातून शहरी भागात राहणारे सर्व आदिवासी बांधव संघटित होऊन बंधुभाव व एकात्मतेची भावना एकमेकांप्रति रुजावी, वाढावी तसेच आदिवासी संस्कृती, बोलीभाषा, सण, उत्सवातील प्रतिके व त्यांच्याप्रतींची आस्था व संवर्धन, मानवतावादी दृष्टिकोन तसेच नैसर्गिक ठेवा वृद्धिंगत व्हावा या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आदिवासी बांधवांचा उदंड प्रतिसाद मिळाला.सदर महोत्सवात पहिल्या माळेपासून ते आज पर्यंत भरगच्च अशा आदिवासी संस्कृतीवर प्रकाश टाकणारे पारंपरिक गायन, नृत्य, परीक्षा, वेशभूषा महिलांच्या स्पर्धा अशा अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. व सदर कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या उस्फूर्त विजेत्यांना बक्षीस देखील वितरण करण्यात आले.
यावेळेस बोलताना आमदार मंजुळाताई गावित म्हणाल्या की, आपली संस्कृती जर जतन करायची असेल तर असे कार्यक्रम गावात तर होतातच पण शहरात आलेल्या आपल्या मुलाबाळांना याविषयी कोणतीही कल्पना नसते म्हणून आपले सण उत्सव परंपरा आपले देव हे कोणकोणते आहेत हे त्यांना माहिती करून देण्यासाठी अशा कार्यक्रमाची नितांत गरज आहे. येणाऱ्या काळामध्ये अशा कार्यक्रमांसाठी आपणास आवश्यक ती मदत हवी आमच्या मार्फत करू अशी देखील ग्वाही आमदारांनी दिली. सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांचे औक्षवंत करून स्वागत केले व आदिवासी पोशाख ताईंनी परिधान करून कणसरा मातेच्या प्रतिमेचे पूजन करीत आरती केली. सदर कार्यक्रमाप्रसंगी आमदार सौं. मंजुळाताई गावित, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी जगन्नाथ वानखेडकर समितीचे अध्यक्ष सुभाष पवार, उपाध्यक्ष काशिनाथ चौरे काळू कोकणी, सचिन चंद्रसिंह बागुल, समन्वयक जगन्नाथ गायकवाड, सहसचिव श्रीकांत गांगुर्डे, खजिनदार देविदास पवार, काशिनाथ चौरे, सदस्य श्रीराम चौधरी, बकाराम सूर्यवंशी, सुरज कोकणे, धीरज गावित, प्रकाश सूर्यवंशी, खंडू बागुल, अमोल चौरे, दयाल बैरम, नाना साबळे, सल्लागार शंकर बागुल, कन्हैयालाल जगताप, सुभाष चौरे, प्रकाश गायकवाड, गुलाब बागुल, संजय सूर्यवंशी, विजय पवार, बाळू बागुल इत्यादी समितीत पदाधिकारी सदर महोत्सव उत्कृष्ट करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.