लोक न्यूज
दि. 9 ऑगष्ट जागतिक आदिवासी दिन जि. प. प्राथमिक केंद्र शाळा अंमळगाव येथे उत्साहात साजरा करण्यात आला. क्रांतीवीर जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेच पुजन करण्यात आले याप्रसंगी सरपंच , उपसरपंच , सर्व सदस्य , विविध संस्थांचे पदाधिकारी व आदिवासी बंधु -भगिनी मुख्याध्यापक , शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री. अरुण पाटील यांनी सुत्रसंचालन करून आदिवासी दिनाचे महत्व सांगितले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामस्थांनी अनमोल सहकार्य केले .