लोक न्यूज
अमळनेर : सख्या  अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या धुळे येथील एका विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
      पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली की ती तिच्या आई वडिलांच्या घरी जपान जीन येथे असताना तिचे पती(पीडितेचा बाप) सैय्यद सलीम हुसेन सैय्यद  वय ३६ रा कबिरगंज धुळे हा त्याना भेटायला ७ रोजी रात्री ९  वाजता घरी आला. तेव्हा त्याने त्याच्या दहा वर्षाच्या मुलीला जवळ घेऊन तिच्याशी अश्लील कृत्य करु लागला. मुलीच्या आईने त्याला विरोध करून जाब विचारला असता त्याने मी हिला सोबत घेऊन जाईन असे सांगितले. तेव्हा पीडितेच्या आईने त्याला पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिल्याने तो लागलीच तेथून पळून गेला. पीडितेच्या  आजीने ही घटना ऍड तमन्ना शाह ,व ऍड मुस्कान शाह याना सांगितली. त्यांच्या सोबत येऊन पीडितेने अमळनेर पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम  ७४ ,पोस्को कायदा कलम ८ ,कलम ९(एल) , ९(एम), ९ (एन) , १० प्रमाणे वडीलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत आहेत.